Cricket History | क्रिकेटचा खेळ पहिल्यांदा कुठे खेळला गेला?

Cricket History
Cricket History | क्रिकेटचा खेळ पहिल्यांदा कुठे खेळला गेला?
Published on
Updated on

लंडन ः क्रिकेट हा खेळ आज जगातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. त्यामुळे या खेळाची मुळे इंग्रजी इतिहासात खोलवर रुजलेली आहेत. आपण पाहिले तर आज जगाच्या प्रत्येक कानाकोपर्‍यात क्रिकेट खेळ मोठ्या आवडीने खेळला जातो. पण, क्रिकेट पहिल्यांदा कसा आणि कुठे खेळला गेला हे तुम्हाला माहिती आहे का? क्रिकेटची सुरुवात ही आग्नेय इंग्लंडमध्ये वील्ड नावाच्या एका ठिकाणी झाली होती. विशेषतः, तेथील केंट आणि ससेक्स या काही प्रदेशांमध्ये क्रिकेट हा खेळ खेळला जात होता. इतिहासकारांचा असा विश्वास आहे की, हा खेळ सॅक्सन किंवा सुरुवातीच्या नॉर्मन काळात 16 व्या शतकाच्या आसपास सुरू झाला.

या खेळाच्या सुरुवातीच्या स्वरूपात क्रिकेट हा खेळ लहान मुलं अर्थातच मोकळ्या मैदानात खेळत असत. त्यावेळी बॅट हा प्रकार नव्हता म्हणून त्याऐवजी वाकलेली काठी किंवा लाकडाचा तुकडा वापरत असत. चेंडू हा लोकर, कापडाचे तुकडे किंवा दगडापासून बनवला जात असे. क्रिकेटच्या अस्तित्वाचा सर्वात मजबूत ऐतिहासिक पुरावा 1598 मध्ये सरे येथील एका न्यायालयीन खटल्यातून मिळतो. या प्रकरणात जॉन डेरिक नावाच्या 59 वर्षीय व्यक्तीने साक्ष दिली की, तो आणि त्याचे शाळेतील मित्र 1550 च्या सुमारास इंग्लंडमधील गिल्डफोर्ड येथे क्रिकेट नावाचा खेळ खेळले होते.

हा दस्तावेज क्रिकेटचा सर्वात जुना लिखित संदर्भ मानला जातो. त्यावरून असे सूचित होते की, 16 व्या शतकाच्या मध्यापर्यंत हा खेळ नियमितपणे खेळला जात होता. 17 व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत क्रिकेट शाळेच्या मैदानाबाहेर गेले आणि प्रौढांमध्ये हा खेळ खूप लोकप्रिय झाला. 1611 च्या नोंदींवरून असे दिसून येते की, इंग्लंडच्या ससेक्स या प्रदेशामधील दोन पुरुषांनी रविवारी चर्चला जाण्याऐवजी क्रिकेट खेळल्याबद्दल त्यांना दंड ठोठावण्यात आला होता. क्रिकेटची लोकप्रियता वाढत असताना या खेळाचे नियम ठरविले गेले. क्रिकेटचे पहिले अधिकृत नियम 1744 मध्ये लिहिले गेले. 1787 मध्ये लंडनमध्ये मेरीलेबोन क्रिकेट क्लबची स्थापना झाली तेव्हा हे नियम पहिल्यांदा पाळण्यात आले.

क्रिकेटचे नियम सुधारण्यात आणि राखण्यात या क्लबने मोठी भूमिका बजावली. क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय खेळात रूपांतर 19 व्या शतकात सुरू झाले. पहिला अधिकृत क्रिकेटचा सामना 1877 मध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. मनोरंजक बाब म्हणजे, 1844 मध्ये कॅनडा आणि अमेरिका यांच्यात यापेक्षाही आधीचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला होता, तेव्हा हा सामना अनधिकृत होता. 18 व्या शतकात बि—टिश खलाशी आणि सैनिकांनी क्रिकेट भारतात आणले. देशातील पहिला क्रिकेट क्लब 1792 मध्ये कोलकाता येथे स्थापन झाला. कालांतराने भारतीयांनी मोठ्या उत्साहाने हा खेळ स्वीकारला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news