Worlds First Smartphone | जगातील पहिला स्मार्टफोन कसा होता?

Worlds First Smartphone |
Worlds First Smartphone | जगातील पहिला स्मार्टफोन कसा होता?
Published on
Updated on

वॉशिंग्टन : आज स्मार्टफोन ही एक मूलभूत गरज बनली आहे. लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. आपण आता आपली अनेक दैनंदिन कामे स्मार्टफोनद्वारे करतो. ऑनलाईन पेमेंटपासून ते ऑनलाईन शॉपिंगपर्यंत, सर्व काही आता स्मार्टफोनद्वारे केले जाते. आपल्या स्मार्टफोनशिवाय अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये व्यत्यय येऊ शकतो. आपण दिवसातून असंख्य वेळा आपला स्मार्टफोन वापरतो; पण जगातील पहिला स्मार्टफोन कोणता होता आणि त्याचे फीचर्स काय होते? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

सर्वप्रथम, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, ज्याला आपण आता स्मार्टफोन म्हणतो, त्याचा उगम 1990 च्या दशकात झाला. त्या काळात फोनचा वापर केवळ कॉल आणि मेसेजसाठी केला जात असे; पण एका कंपनीने असे तंत्रज्ञान आणले, ज्यामुळे संपूर्ण मोबाईल जग बदलून गेले. 1992 मध्ये, आयबीएमने एक मोबाईल फोन विकसित केला, ज्यामध्ये टच स्क्रीन आणि कॉलिंगसह अनेक डिजिटल फीचर्स होते. या फोनचे नाव आयबीएम सायमन पर्सनल कम्युनिकेटर असे ठेवण्यात आले. आयबीएम सायमन पर्सनल कम्युनिकेटर हा जगातील पहिला स्मार्टफोन मानला जातो. तो सर्वप्रथम 1994 मध्ये अमेरिकेत लाँच करण्यात आला. त्यावेळी त्याची किंमत अंदाजे 899 डॉलर्स होती, जी त्या काळातील एक मोठी रक्कम होती.

जगातील पहिला स्मार्टफोन खरेदी करणारा पहिला ग्राहक ही काही सामान्य व्यक्ती नव्हती. ते एक अमेरिकन व्यावसायिक होते. कंपनीने त्यांचे नाव उघड केले नाही; पण त्यांनी हे सांगितले की, स्मार्टफोनचा पहिला खरेदीदार एक व्यावसायिक कार्यकारी आणि सरकारी अधिकारी होता. 90 च्या दशकात लाँच झालेला हा स्मार्टफोन त्याच्या काळाच्या मानाने खूपच प्रगत होता. त्यात टच स्क्रीन, ई-मेल पाठवण्याची आणि स्वीकारण्याची सुविधा, कॅलेंडर, संपर्क जतन करण्याची सोय, नोटपॅड आणि फॅक्स करण्याची सुविधा होती. विक्री झालेल्या युनिटस्बद्दल बोलायचे झाल्यास, त्यावेळी आयबीएम सायमन पर्सनल कम्युनिकेटरचे सुमारे 50,000 युनिटस् विकले गेले, जे कंपनीसाठी एक मोठे यश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news