Account Holder Identity Theft | खातेदाराची ओळख चोरी झाल्यास काय करावे?

खाते सुरक्षित करणे आणि कागदपत्रे दुरुस्त करण्याचा सोपा मार्ग
Account Holder Identity Theft |
Account Holder Identity Theft | खातेदाराची ओळख चोरी झाल्यास काय करावे?
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : सध्याच्या डिजिटल युगात तुमची वैयक्तिक माहिती चोरीला जाणे ही एक गंभीर समस्या बनली आहे. तुमच्या नावावर बनावट क्रेडिट कार्ड काढणे, बँक खाते हॅक करणे किंवा वैद्यकीय सुविधांसाठी तुमच्या माहितीचा गैरवापर करणे असे प्रकार घडल्यास मोठा मन:स्ताप होऊ शकतो. मात्र, अशा परिस्थितीत घाबरून न जाता योग्य पावले उचलल्यास तुम्ही तुमची ओळख आणि खाती पुन्हा सुरक्षित करू शकता.

खाती सुरक्षित करा

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सर्वात आधी तुमची बँक, क्रेडिट कार्ड कंपनी आणि मोबाईल नेटवर्क प्रोव्हायडरशी संपर्क साधा. तुमचे ईमेल आणि बँक खात्यांचे पासवर्ड तातडीने बदला, कारण हॅकर्स ईमेलद्वारे इतर खात्यांचे पासवर्ड रिसेट करू शकतात. तसेच, तुमच्या नावावर नवीन कर्ज किंवा क्रेडिट कार्ड निघू नये म्हणून क्रेडिट ब्युरोकडे 'फ्रॉड अलर्ट' किंवा 'क्रेडिट फ्रीज' लावा.

सर्व पुराव्यांची 'केस फाईल' तयार करा

फसवणुकीच्या तक्रारीसाठी तुम्हाला अनेक कंपन्यांशी वारंवार बोलावे लागू शकते. प्रत्येक वेळी नवीन सुरुवात करावी लागू नये म्हणून संशयास्पद व्यवहारांच्या तारखा, बँक स्टेटमेंट्स, तक्रार क्रमांक आणि संबंधित अधिकाऱ्यांची नावे यांची एक स्वतंत्र फाईल तयार ठेवा. संवेदनशील कागदपत्रे केवळ अधिकृत माध्यमांतूनच पाठवा.

अधिकृत तक्रार आणि कागदपत्रांमध्ये दुरुस्ती

फसवणुकीच्या प्रकारानुसार संबंधित संस्थांकडे रीतसर तक्रार नोंदवा. बँक व्यवहार, क्रेडिट रिपोर्ट किंवा वैद्यकीय नोंदींमध्ये झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी अधिकृत 'आयडेंटिटी थेफ्ट रिपोर्ट' सादर करा. प्रत्येक तक्रारीची प्रत आणि समस्येचे निराकरण झाल्याचे लेखी पत्र जपून ठेवा.

सातत्यपूर्ण पाठपुरावा गरजेचा

ओळख पुनर्स्थापित करण्याची प्रक्रिया एका दिवसात पूर्ण होत नाही. त्यामुळे कंपन्यांकडून मिळालेल्या मुदतीनुसार नियमित पाठपुरावा करा आणि पुढील काही महिने तुमचे बँक स्टेटमेंट व क्रेडिट रिपोर्ट तपासत राहा. गरज भासल्यास व्यावसायिक 'आयडेंटिटी प्रोटेक्शन' तज्ज्ञांची मदत घेणे फायदेशीर ठरू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.