

नवी दिल्ली : भारतच नव्हे तर अख्खं जग हे इंटरनेटच्या महाजाळ्यात अडकलेले आहे. जर इंटरनेट बंद पडले तर काय होईल, याची तुम्ही कल्पना केली आहे का? लाखो लोक बेरोजगार होतील, तसेच अनेक व्यवसाय एका सेकंदात ठप्प पडतील. याचा परिणाम देशातील आर्थिक व्यवस्थेसाठी विनाशकारी गोष्ट ठरेल.
इंटरनेट बंद पडल्यास सर्वात मोठा फटका गिग वर्कर्स म्हणून ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील लाखो लोकांना बसरणार. फ्रीलान्सर्स, ग्राफिक डिझायनर्स, डिलिव्हरी पार्टनर्स आणि राईड-शेअरिंग ड्रायव्हर्स या क्षेत्रात काम करणारे जगभरात अंदाजे 400-435 दशलक्ष वर्कर्स आहेत, ज्यांना सगळ्यात मोठे नुकसान होईल. इंटरनेट बंद पडल्यास या लाखो लोकांचा रोजगार एका सेकंदात जाईल आणि यांचं दैनंदिन उत्पन्न पूर्णपणे बंद होईल. ज्यामुळे हे सगळे क्षेत्र डबघाईला येईल. जागतिक आर्थिक मंचाच्या ताज्या आकडेवारीनुसार सध्या डिजिटल क्षेत्रात 73 दशलक्ष नोकर्या अवंलबून आहेत. या क्षेत्रातील नोकर्या पूर्णपणे इंटरनेटवर अवंलबून असून, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, कंटेंट क्रिएशन आणि रिमोट वर्किंगवर असते.
इंटरनेट बंद झाल्यानंतर या सगळ्यांना मोठा फटका बसणार आहे. या क्षेत्रात 2030पर्यंत ही संख्या 92 दशलक्षपर्यंत वाढणार आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. इंटरनेट बंद पडल्यास लाखो उच्च कुशल व्यावसायिक आणि नोकरदार एका सेकंदात बेरोजगार होतील. याचा फटका फक्त व्यवसायाला नाही, लाखो लोकांच्या नोकरीवर गदा आणणारा ठरेल. जर देशाबद्दल बोलायचे झाले तर सगळ्यात मोठे नुकसान हे अमेरिकेचे होणार आहे. अमेरिका पूर्णपणे इंटरनेटवर अवलंबून आहे.
एका अमेरिकत 28.4 दशलक्ष नोकर्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे इंटरनेटवर अवलंबून आहे. तर 11.2 दशलक्ष नोकर्या या थेट डिजिटल क्षेत्राशी जोडल्या असून, याचा 18 टक्के वाटा हा या देशाच्या अर्थव्यवस्थेशी जोडला गेला आहे. जर इंटरनेट बंद पडले तर महासत्तांचा जीडीपी मोठ्या प्रमाणात घसणार यात शंका नाही. खरंतर डिजिटल क्षेत्रावर आज 92 टक्के नोकर्या आहेत. म्हणजे 92 टक्के लोकांचा संसार इंटरनेट बंद झाल्यामुळे संकटात येईल. एवढंच नाही तर बँकिंग, रिटेल, शिक्षण किंवा आरोग्यसेवा असो, डेटा आणि कनेक्टिव्हिटी कोलमडून पडेल. इंटरनेट बंद झाल्यामुळे केवळ ऑनलाईन कामांवर परिणाम नाही होणार, तर रुग्णालयांचे कामकाज, बँकेचे व्यवहार आणि शालेय शिक्षण क्षेत्रावरही याचा मोठा फटका बसेल.
भारतात, जिथे डिजिटल इंडियाला प्राधान्य दिले जात आहे, तिथे लाखो तरुण आयटी, बीपीओ, ई-कॉमर्स आणि ऑनलाईन शिकवणीच्या माध्यमातून आपले घर चालवतात. ते एका सेकंदात संकटात येतील. एवढंच नाहीतर लहान शहरांमधील दुकानदार आता णझख आणि ऑनलाईन ऑर्डर घेतात. इंटरनेट नसेल तर केवळ पेमेंट प्रणालीच विस्कळीत होणार नाही, तर पुरवठा साखळी उद्ध्वस्त होईल. त्यासोबतच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि कंटेंट क्रिएटर्स यांना रातोरात आपला उत्पन्नाचा स्रोत गमवावा लागेल.