what happens after death | मृत्यूनंतर नक्की काय होतं?

हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांवर संशोधनानंतर डॉक्टरांचा मोठा खुलासा
what happens after death | मृत्यूनंतर नक्की काय होतं?
Published on
Updated on

न्यूयॉर्क : माणसाचा मृत्यू झाल्यानंतर नक्की काय होते? हा प्रश्न शतकानुशतके अनुत्तरित आहे. मात्र, न्यूयॉर्कमधील लँगोनी मेडिकल सेंटरच्या डॉ. सॅम परनिया आणि त्यांच्या टीमने केलेल्या एका क्रांतिकारी संशोधनाने मृत्यूबाबतचे अनेक समज बदलून टाकले आहेत.

त्यांच्या संशोधनातील धक्कादायक निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहेत.

मेंदू तासन्तास सक्रिय : क्लिनिकली मृत (हृदयाचे ठोके थांबणे) घोषित केल्यानंतरही माणसाचा मेंदू कित्येक तासांपर्यंत सक्रिय राहू शकतो. संशोधनानुसार, हृदय थांबल्यानंतर एक तासानेसुद्धा मेंदूमध्ये जाणीव, स्मृती आणि विचारांशी संबंधित गामा आणि अल्फा लहरी पाहायला मिळाल्या.

ल्यूसिड डाईंग : हृदयविकाराचा झटका येऊन पुन्हा जिवंत झालेल्या 40 टक्के रुग्णांनी मृत्यूच्या जवळचा (निअर डेथ एक्स्पीरिअन्स) अनुभव सांगितला. त्यांनी स्वतःला शरीराबाहेरून पाहणे, डॉक्टरांचे बोलणे ऐकणे, मृत नातेवाईकांना भेटणे आणि आपल्या संपूर्ण आयुष्याचा एक रिव्ह्यू पाहिल्याचे सांगितले.

मेंदूचा ब्रेकिंग सिस्टम हटतो : मृत्यूच्या वेळी मेंदूवरील नैसर्गिक बंधने दूर होतात. यामुळे माणसाला त्याच्या आयुष्यातील सर्व आठवणी, भावना आणि नैतिक कृतींचे आकलन स्पष्टपणे होते.

मृत्यू ही प्रक्रिया आहे, शेवट नाही!

डॉ. सॅम परनिया यांच्या मते, मृत्यू ही एक फायनल घटना नसून ती एक संथ प्रक्रिया (प्रोसेस) आहे.

1. हृदयाचे ठोके थांबल्यानंतर मेंदूच्या पेशी लगेच मरत नाहीत.

2. ऑक्सिजनअभावी त्या हळूहळू निकामी होतात; पण योग्य उपचार मिळाल्यास हा परिणाम उलटवता येऊ शकतो.

3. योग्य सीपीआर सुरू असल्यास मेंदू आपली विद्युत ऊर्जा पुन्हा मिळवू शकतो.

विज्ञानाचा आध्यात्मिक द़ृष्टिकोन :

अनेकजण या अनुभवांना आत्मा किंवा परलोकाचा प्रवास मानतात. परंतु, विज्ञानाच्या भाषेत याला मेंदूची उच्च-वारंवारता क्रिया (हाय फ्रिक्वेन्सी अ‍ॅक्टिव्हिटी) म्हटले जाते. येल विद्यापीठाच्या अशाच एका संशोधनात डुकराच्या मेंदूची कार्यक्षमता मृत्यूनंतर पुन्हा सुरू करण्यात यश आले होते, जे या सिद्धांताला दुजोरा देते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news