औषधाच्या पाकिटावर लाल रेषा कशासाठी असते?

औषधांच्या पाकिटावर ही लाल रेषा समजून घेणे गरजेची आहे का?
What Does The Red Line On Medicine Strips Indicate?
औषधाच्या पाकिटावर लाल रेषा कशासाठी असते?Pudhari File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : सध्याच्या काळात अनेक सुपरबग्जचा धोका वाढलेला आहे. हे सुपरबग्ज असे जीवाणू असतात, ज्यांच्यावर औषधांचा परिणाम होत नाही. हे होण्याचे कारण म्हणजे सध्या अँटिबायोटिक्सचा बेसुमार वाढलेला वापर. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवायही अनेक लोक माहीत असलेल्या औषधांचे पाकीट विकत घेतात. याच कारणामुळे औषधांच्या पाकिटावर लाल रेषा असते.

अनेक लोकांच्या घरात औषधांचा एक वेगळा बॉक्स असतो. त्यात वेगवेगळ्या समस्यांसाठी औषधे ठेवली जातात, जेणेकरून आजारी पडल्यास तातडीचे उपचार करता यावेत. मात्र, तुम्ही कधी गोळ्यांच्या पॅकेट मागील लाल रेषा बघितली आहे का? जरी तुम्ही ती लाल रेषा बघितली असली तरी त्या मागचे नेमकं कारण काय आहे? चला तर या मागचे नेमकं कारण काय आहे ते जाणून घेऊयात. तुम्ही जेव्हा मेडिकलमधून गोळ्यांचे पॅकेट खरेदी करता तेव्हा पॅकेटच्या मागील बाजूस लाल रेष असते, त्या रेषेचा असा अर्थ आहे की, तुम्हाला डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध खरेदी करता येत नाही. दरम्यान, केमिस्टना ही औषधे विकण्याची परवानगी केवळ तेव्हाच असते, जेव्हा तुम्हाला डॉक्टरांनी चिठ्ठी दिलेली असते. अँटिबायोटिक्स औषधांचा चुकीचा वापर टाळण्यासाठी औषधांवर लाल रेषा दिलेली असते. यात गोळ्यांच्या पॅकेटवर असलेल्या लाल रेष देण्याचा उद्देश म्हणजे मलेरिया आणि टीबीसारख्या आजारांच्या संक्रमणासह अनेक गंभीर आजारांसाठी डॉक्टरांच्या परवानगी शिवाय किंवा थेट केमिस्टकडून अँटिबायोटिक्सच्या खरेदी-विक्रीला रोखण्यासाठी असते. काही औषधांच्या पॅकेटवर ‘आरएक्स’ असं लिहिलेलं असतं. याचा अर्थ असा आहे की, या औषधांची खरेदी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावं. जर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशाप्रकारचं औषध विकत घेतलं, तर त्याचे तुमच्या शरीरावर मोठे परिणाम होतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news