whale breastfeeding | खोल समुद्रात व्हेल मातेचे पिल्लास स्तनपान

whale breastfeeding  |
whale breastfeeding | खोल समुद्रात व्हेल मातेचे पिल्लास स्तनपान
Published on
Updated on

वॉशिंग्टन : अथांग समुद्राकडे पाहिलं की, त्याची व्याप्ती नेमकी किती आहे? हाच थक्क करणारा प्रश्न मनात घर करून जातो. याच समुद्रामध्ये एक असं विश्व आहे, असे जीव आहेत, ज्यांचं अस्तित्व सतत भारावून सोडतं. मुळात हे जग सामान्य व्यक्तीसाठी कुतूहलाहून आणि एखाद्या रहस्याहून कमी नाही. अशाच या सागरी जीवाच्या जगण्यावरून पडदा उचलण्याचं काम करणारा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. जिथं निसर्गाचा अद्भुत आविष्कार दिसतोय. या व्हिडीओमध्ये एक मादी व्हेल तिच्या पिलाला दूध पाजताना दिसत आहे.

बहुतांश सस्तन सजीवांमध्ये मादी ही पिलाला स्तनपानाच्या माध्यमातून दूध पाजते. मात्र, व्हेल माशामध्ये ही प्रक्रिया काहीशी वेगळ्या पद्धतीनं होत असल्याचं पाहता येतं. खोल समुद्रात, चहुबाजूंनी असणार्‍या पाण्यामध्ये जिथं दूध पाजणं जवळपास अशक्य आहे, असाच अनेकांचा समज या व्हिडीओमुळं मोडीत निघाला आहे. निसर्गाने जणू व्हेल माशाला दिलेलं हे वरदानच आहे, असं म्हणायला हरकत नाही. याच प्रक्रियेवर उजेड टाकण्याचं काम व्हायरल होणारा हा व्हिडीओ करत आहे.

मादी व्हेल पिलाला दूध पाजण्यासाठी प्रचंड दबावाचा वापर करत शरीरातून दूध बाहेर काढते. हे दूध इतकं घट्ट असतं ते पाण्यामध्ये मिसळत नाही आणि थेट पिलाच्या तोंडात जातं. लहान पिलाला हे दूध अगदी सहजपणे पिता येतं आणि त्याचं पोट भरतं. तज्ज्ञांच्या माहितीनुसार व्हेल माशाचं दूध हे सामान्य सस्तन प्राण्याच्या तुलनेत अधिक स्निग्ध आणि दाट असतं, ज्यामुळं पिलाची वाढ वेगानं होण्यास मदत होते आणि समुद्राच्या प्रचंड थंड पाण्यातही जीवित राहण्यास मदत होते.

याच कारणामुळे व्हेल माशाची पिलं सामान्य कालावधीतही वेगानं मोठी होतात. व्हेल मासा हा ब्लू व्हेल म्हणूनही ओळखला जातो. पूर्ण वाढ झालेल्या या निळ्या देवमाशाचे वजन हे 40 हत्तींइतकं असतं. याच व्हेल माशाच्या जगभरात 90 हून अधिक प्रजाती आहेत. जाणून आश्चर्य वाटेल; पण हे व्हेल मासे गाऊ शकतात आणि या माध्यमातून ते एकमेकांशी संवाद साधतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news