IPhone History | ८९ वर्षांपूर्वीही होता आयफोन?

IPhone History |
IPhone History | ८९ वर्षांपूर्वीही होता आयफोन?
Published on
Updated on

लंडन : आजच्या काळात ‘आयफोन’ हा जगातील सर्वोत्तम आणि लोकप्रिय मोबाईल ब्रँड मानला जातो, पण ८९ वर्षांपूर्वीच्या एका प्राचीन पेंटिंगमध्ये आयफोनसारखी वस्तू दिसल्याचा दावा सध्या केला जात असून, यामुळे तंत्रज्ञान आणि इतिहासप्रेमींमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ही पेंटिंग सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेक जण याला ‘टाईम ट्रॅव्हल’चा पुरावा मानत आहेत.

इटालियन कलाकार उम्बर्टो रोमानो यांनी १९३७ मध्ये हे पेंटिंग साकारले होते, ज्याचे नाव ‘मिस्टर पिंचन अँड द सेटलिंग ऑफ स्प्रिंगफील्ड’ असे आहे. या पेंटिंगमध्ये १६२० च्या दशकात स्प्रिंगफील्ड शहरात युरोपियन लोकांचे आगमन झाल्याचे दृश्य दाखवले आहे. परंतु, या चित्रात सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे एक स्थानिक अमेरिकन माणूस हातामध्ये एक लहान, काळी आणि आयताकृती वस्तू पकडून बसलेला दिसत आहे. तो त्या वस्तूकडे अगदी अशा प्रकारे पाहत आहे, जसे आजचे लोक स्मार्टफोन किंवा सेल्फी घेताना पाहतात. ॲपल कंपनीने अधिकृतपणे पहिला आयफोन २००७ मध्ये लाँच केला होता. मग १९३७ च्या पेंटिंगमध्ये ही वस्तू कुठून आली? या प्रश्नाने सोशल मीडियावर वादळ निर्माण केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news