Warrior Crocodile | डायनासोरच्या आधी ब्राझीलमध्ये होती ‘योद्धा मगर’

Warrior Crocodile
Warrior Crocodile | डायनासोरच्या आधी ब्राझीलमध्ये होती ‘योद्धा मगर’
Published on
Updated on

रिओ डी जानेरिओ : डायनासोरच्या युगापूर्वी, सुमारे 240 दशलक्ष वर्षांपूर्वी ट्रयासिक कालखंडात, ब्राझीलमध्ये वावरणार्‍या एका महाकाय ‘योद्धा सरड्याचा’ शोध संशोधकांनी लावला आहे. हा शोध डायनासोर पृथ्वीवर वर्चस्व गाजवण्यासाठी येण्यापूर्वीच्या काळातील माहितीतील अंतर भरून काढतो आणि आता आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका यांच्यातील संबंधांवर अधिक प्रकाश टाकतो.

हा चिलखतधारी सरपटणारा प्राणी डायनासोरसारखा दिसत असला, तरी तो प्रत्यक्षात आधुनिक मगरींचा पूर्वज आहे. शास्त्रज्ञांनी या प्राण्याला टी. बेलॅटॉर (Tainrakuasuchus bellator) असे नाव दिले आहे. हे नाव ग्रीक, लॅटिन आणि मूळ ब्राझिलियन गुआरानी भाषेतील शब्दांचे मिश्रण असून, याचा अर्थ ‘तीक्ष्ण दातांचा योद्धा मगर’ असा होतो. संशोधन टीमने 13 नोव्हेंबर रोजी ‘जर्नल ऑफ सिस्टिमॅटिक पॅलेऑन्टोलॉजी’ मध्ये प्रकाशित केलेल्या एका अभ्यासात या शोधाची माहिती दिली. ‘या शोधामुळे जीवनाच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या क्षणाबद्दल माहिती मिळते, जो डायनासोरच्या उदयापूर्वीचा काळ होता,’ असे या अभ्यासाचे मुख्य लेखक आणि ब्राझीलमधील ‘फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ सान्ता मारिया’ येथील जीवाश्मशास्त्रज्ञ रोड्रिगो टेंप मुल्लर यांनी एका निवेदनात सांगितले.

ट्रयासिक कालखंडात (252 दशलक्ष ते 201 दशलक्ष वर्षांपूर्वी) जमिनीवर राहणार्‍या पृष्ठवंशीय प्राण्यांवर आर्कोसॉरचे वर्चस्व होते. या नावाचा अर्थ ‘राज्य करणारे सरपटणारे प्राणी’ असा आहे आणि त्याचे दोन मुख्य गट आहेत. पहिला गट, ऑर्निथोसुकिया, यातून पक्षी आणि डायनासोर उत्क्रांत झाले. दुसरा गट, स्यूडोसुचिया, यातून आधुनिक मगरींसारखे क्रोकोडिलियन उत्क्रांत झाले. ‘टी-बेलॅटॉर’ हा स्यूडोसुचिया गटातील आहे. या प्राण्याची लांबी सुमारे 7.9 फूट (2.4 मीटर) आणि वजन 130 पौंड (60 किलोग्रॅम) होते. त्याची मान लांब आणि पातळ जबडा तीक्ष्ण दातांनी भरलेला होता. टी.

बेलॅटॉर ज्या प्रकारच्या स्यूडोसुचिया (ज्यांना पोपोसोरोइडस् म्हणतात) गटातील आहे, त्यांचे फार कमी जीवाश्म दक्षिण अमेरिकेत सापडले आहेत, असे संशोधकांनी नमूद केले. मे महिन्यात ब्राझीलमधील डोना फ्रान्सिस्का नगरपालिकेमध्ये उत्खनन करताना टीमला टी. बेलॅटॉरचा अर्धवट सांगाडा सापडला, ज्यात खालचा जबडा, पाठीचा कणा यांचा समावेश आहे. या सरपटणार्‍या प्राण्याची पाठ ऑस्टिओडर्म्स नावाच्या हाडांच्या प्लेटस्ने झाकलेली होती, जी आधुनिक मगरींमध्येही आढळतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news