Walnuts Superfood | आरोग्यासाठी अक्रोड ठरते ‘सुपरफुड’!

Walnuts Superfood |
Walnuts Superfood | आरोग्यासाठी अक्रोड ठरते ‘सुपरफुड’!
Published on
Updated on

नवी दिल्ली : आरोग्यदायी सुक्या मेव्यामध्ये अक्रोडचा समावेश होतो. त्याचे कठीण कवच कवटीसारखे आणि आतील बी मेंदूसारखे दिसते. विशेष म्हणजे असे रंगरूप असलेला हा सुका मेवा मेंदूसाठी अत्यंत लाभदायक ठरतो. त्याचे नियमित आणि संतुलित प्रमाणात सेवन केल्याने शरीराला अनेक आवश्यक पोषक तत्त्वे मिळण्यास मदत होते. म्हणूनच अनेक आरोग्यतज्ज्ञ संतुलित आहारात अक्रोडला ‘सुपरफूड’ म्हणतात.

अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड, प्रथिने, फायबर, आरोग्यदायी फॅट, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी6, मॅग्नेशियम, फॉस्फरस, तांबे, मॅंगनीज आणि अनेक पॉवरफूल अँटीऑक्सिडंटस्‌ असतात. ही सर्व पोषक तत्त्वे शरीराच्या सामान्य कार्यासाठी अत्यावश्यक मानली जातात. अक्रोडमधील ओमेगा-3 फॅटी ॲसिड आणि अँटिऑक्सिडंटस्‌ मेंदूचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करतात. नियमितपणे आणि माफक प्रमाणात अक्रोड खाणे स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. म्हणूनच अक्रोडला मेंदूसाठी अनुकूल पदार्थ म्हणूनही ओळखले जाते.

अक्रोडमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. नियमितपणे आणि योग्य प्रमाणात अक्रोड खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहण्यास आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांचा धोका कमी होण्यास मदत होते. अक्रोडमध्ये प्रथिने, फायबर आणि हेल्दी फॅट यांचे योग्य संतुलन असते. नियमित व्यायामासोबत त्यांचे सेवन केल्याने वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. अक्रोडमधील पोषक तत्त्वे शरीराची सामान्य कार्यप्रणाली टिकवून ठेवण्यास, ऊर्जा कायम राखण्यास आणि सर्वांगीण आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. अक्रोड सकाळी खाणे सर्वोत्तम असते. बरेच लोक ते रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खातात. अक्रोडचा समावेश नाश्त्यामध्ये किंवा जेवणांच्या मध्ये एक आरोग्यदायी नाश्ता म्हणून केला जाऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news