व्हिटॅमिन डी-3 च्या कमतरतेमुळे सतत वाटते भीती

व्हिटॅमिन डी-3 हे मानसिक आरोग्याची काळजी घेते
vitamin-d3-deficiency-causes-constant-fear-anxiety
व्हिटॅमिन डी-3 च्या कमतरतेमुळे सतत वाटते भीतीPudhari File Photo
Published on
Updated on

न्यूयॉर्क : आजच्या धकाधकीच्या जीवनात कोणालाच चिंता सुटलेली नाही; पण या चिंतेची पातळी त्रासदायक ठरू नये, आणि याचा विपरीत परिणाम होऊ नये असे वाटत असेल तर व्हिटॅमिन डी-3 चा आहारात आवर्जून समावेश करणे क्रमप्राप्त ठरते. एका अभ्यासातून असे आढळून आले आहे की, व्हिटॅमिन डी-3 ची कमतरता जर असेल तर ती व्यक्ती सतत कोणत्या ना कोणत्या चिंतेत ग्रस्त झालेली दिसू शकते. व्हिटॅमिन डी-3 हे मानसिक आरोग्याची काळजी घेते, त्यामुळे त्याची कमतरता झाल्यास व्यक्तीमध्ये भावनिक आणि मानसिक संतुलनाचा अभाव जाणवू शकतो.

व्हिटॅमिन डी-3 मेंदूमध्ये न्यूरो-स्टिरॉइड रसायन म्हणून काम करते आणि चिंता, नैराश्यासारख्या परिस्थितींवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकते. जेव्हा शरीरात व्हिटॅमिन डी-3 ची कमतरता असते तेव्हा स्किझोफ-ेनिया, नैराश्य आणि हंगामी भावनिक विकार होण्याचा धोका वाढतो. यामुळे लोकांमध्ये चिंता आणि अस्वस्थता वाढत जाते. जी व्यक्ती सतत चिंता किंवा तणावाखाली आहे आणि त्याला त्यापासून आराम मिळवायचा असेल, तर आहारात व्हिटॅमिन डी-3 शी संबंधित पदार्थांचा आवर्जून समावेश करायला हवा.

व्हिटॅमिन डी-3 चा मुख्य स्रोत सूर्यप्रकाश आहे. दररोज 15-30 मिनिटे सूर्यप्रकाशात बाहेर जाऊन वावरल्याने शरीर व्हिटॅमिन डी-3 पुरेशा प्रमाणात मिळू शकते. फिश ऑइलमाश्यांचे तेल, विशेषतः सॅल्मन, मॅकेरल आणि सारडिनसारख्या फिशमध्ये व्हिटॅमिन डी-3 भरपूर प्रमाणात असते. अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये व्हिटॅमिन डी-3 असते. त्यामुळे एक ते दोन अंडी दररोज घेतल्याने व्हिटॅमिन डी-3 ची कमतरता भरून काढता येते.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ दूध, दही आणि चीजमध्येही व्हिटॅमिन डी-3 असते. त्यामुळे या पदार्थांचे सेवन देखील आवश्यक आहे. सूर्यफुलांच्या बिया या बियाण्यांमध्येही व्हिटॅमिन डी-3 असते आणि याचा आहारात समावेश करणे उपयुक्त ठरू शकते. पनीर किंवा कॅसिइनयुक्त उत्पादनांमध्ये देखील व्हिटॅमिन डी-3 असतो. काही व्यक्तींना फक्त आहाराने व्हिटॅमिन डी-3 ची आवश्यक मात्रा मिळवता येत नाही. अशा परिस्थितीत सल्ल्यानुसार व्हिटॅमिन डी-3 चे सप्लिमेंटस् घेता येतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news