संत्र्यापेक्षाही अधिक ‘क’ जीवनसत्त्व असलेली फळे कोणती?

‘क’ जीवनसत्त्वामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते
Vitamin C Fruits
संत्र्यापेक्षाही अधिक ‘क’ जीवनसत्त्व असलेली फळेPudhari File Photo
Published on
Updated on

संत्री, मोसंबी व अन्य लिंबूवर्गीय फळांमध्ये ‘क’ म्हणजेच ‘सी’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असते; मात्र अन्यही काही फळे आहेत, ज्यांच्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व संत्र्यापेक्षाही अधिक प्रमाणात असतात. ‘क’ जीवनसत्त्वामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. ‘क’ जीवनसत्त्वाची कमतरता असेल तर व्यक्तीला थकवा, अशक्तपणा, हिरड्यांमधून रक्त येणे, सांधे दुखणे अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यूएसडीएच्या मते एखाद्या व्यक्तीच्या रोजच्या पोषणासाठी एक संत्रेही पुरेसे ठरते. मात्र संत्र्याशिवायही अन्य काही फळे ज्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते त्यांची ही माहिती.

अननस : अननसात प्रति 100 ग्रॅम 47.8 मिलीग्रॅम ‘क’ जीवनसत्त्व असते. संत्र्यामध्ये 45 मिलीग्रॅम ‘क’ जीवनसत्त्व असते.

किवी : पोषणतज्ज्ञांच्या मते, दोन किवी फळांमध्ये 137 मिलीग्रॅम ‘क’ जीवनसत्त्व असते. किवी हा प्रोबायोटिक्सचाही समृद्ध स्रोत आहे, जे पचनसंस्था चांगली ठेवतात.

जांभूळ : जांभळामध्ये प्रति 100 ग्रॅम 80 ते 90 मिलीग्रॅम ‘क’ जीवनसत्त्व असते. ते रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी तसेच जखमा भरणे, त्वचेमध्ये कोलेजनचे उत्पादन आणि लोहाचे शोषण यासाठी मदत करते.

पपई : पपईमध्ये दैनंदिन गरजेपेक्षा दीड पट अधिक ‘क’ जीवनसत्त्व असते. रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी तसेच हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ते उपयुक्त ठरते.

बोर : बोरांमध्ये प्रति 100 ग्रॅम सुमारे 90 मिलीग्रॅम ‘क’ जीवनसत्त्व असते. त्यामुळे हे छोटेसे फळ मोठ्या प्रमाणात लाभदायक ठरते. हिवाळ्यात बोरं उपलब्ध असतात.

आवळा : आवळ्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्वाचे प्रमाण प्रति 100 ग्रॅम 500 ते 700 मिलीग्रॅम असते. हा व्हिटॅमिन ‘सी’चा उत्कृष्ट स्रोत आहे. डोळे, केस, त्वचा यांच्या आरोग्यासाठी ते गुणकारी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news