Airbag Helmet | दुचाकीस्वारांच्या एअरबॅग हेल्मेटचा व्हायरल व्हिडीओ चर्चेत

हेल्मेटमधून संपूर्ण शरीर झाकणारी एअरबॅग बाहेर येण्याचा दावा
Airbag Helmet |
Airbag Helmet | दुचाकीस्वारांच्या एअरबॅग हेल्मेटचा व्हायरल व्हिडीओ चर्चेत
Published on: 
Updated on: 

बीजिंग : बाईकवरून पडताच हेल्मेटमधून बाहेर येणारी फुल-बॉडी एअरबॅग दाखवणाऱ्या एका व्हिडीओमुळे सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. या व्हिडीओमध्ये दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळताच त्याच्या हेल्मेटमधून एक मोठी एअरबॅग बाहेर येऊन संपूर्ण शरीराला झाकून टाकते, जेणेकरून जमिनीवर आदळताना होणारा धक्का कमी होईल. हे तंत्रज्ञान चीनमधील ‘लॅन्क्सी येमा मोटरसायकल फिटिंग्ज’ आणि ‘यॅनफेंग ऑटोमोटिव्ह’ या दोन कंपन्यांनी विकसित केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या दोन्ही कंपन्यांनी अशा कोणत्याही उत्पादनाची अधिकृत घोषणा केलेली नाही. शिवाय व्हिडीओतील हेल्मेटवर ‘एजीव्ही’ (AGV) सारख्या वेगळ्याच ब्रँडचा लोगो दिसत असल्याने हा व्हिडीओ एआयच्या मदतीने तयार केला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सोशल मीडियावर अनेक वेळा भन्नाट व्हिडीओ येत असतात. मात्र ते खरेच असतील याची खात्री नसते. आताही या व्हिडीओने लोकांचे लक्ष वेधून घेतलेले असले तरी त्याच्या सत्यतेबाबत संशय आहे. व्हिडीओतील या दाव्यांची कोणतीही स्वतंत्र चाचणी, सुरक्षा प्रमाणपत्र किंवा अधिकृत पुष्टी अद्याप समोर आलेली नसल्याने व्हायरल व्हिडीओतील माहितीबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. दुचाकीस्वारांच्या सुरक्षेसाठी एअरबॅग जॅकेट आणि इतर सुरक्षा साधनांवर प्रत्यक्ष काम सुरू असले, तरी हेल्मेटमधून संपूर्ण शरीराला एअरबॅग बाहेर येण्याच्या व्हायरल दाव्याला अद्याप ठोस आधार मिळालेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.