Vera Rubin Observatory | वेरा सी. रुबिन वेधशाळेने एका रात्रीत जारी केले 8 लाख ‘अलर्टस्’

Vera Rubin Observatory  |
Vera Rubin Observatory | वेरा सी. रुबिन वेधशाळेने एका रात्रीत जारी केले 8 लाख ‘अलर्टस्’
Published on
Updated on

वॉशिंग्टन : अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात एक मोठी कामगिरी समोर आली आहे. नुकतीच कार्यान्वित झालेली ‘वेरा सी. रुबिन वेधशाळा’ एका रात्रीत तब्बल आठ लाख खगोलशास्त्रीय अलर्ट जारी केले आहेत. शोधांची ही संख्या अत्यंत थक्क करणारी असून, वर्षाच्या अखेरीस ती दहा पटीने वाढण्याची शक्यता आहे.

चिली देशातील सेरो पाचोन पर्वतावर स्थित ही दुर्बीण संपूर्ण आकाशावर लक्ष ठेवून आहे. अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाऊंडेशनने दिलेल्या निवेदनानुसार, या वेधशाळेने जारी केलेले अलर्ट शास्त्रज्ञांना ‘नवीन लघुग्रह, स्फोट होणारे तारे आणि रात्रीच्या आकाशातील इतर बदलांकडे’ निर्देश करतात. रुबिन वेधशाळेची ही केवळ सुरुवात आहे. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, लवकरच ही वेधशाळा दररात्री 70 लाख अलर्ट जारी करेल. ‘एनएसएफ’चे कार्यक्रम संचालक लुका रिझी यांनी सांगितले की, ‘माहितीच्या या महाप्रवाहामुळे खगोलशास्त्रातील घटना जशा घडत आहेत, तशाच पाहणे शक्य होईल.’

या संशोधनाचे फायदे :

लघुग्रहांचा शोध आणि धोका : पृथ्वीला संभाव्य धोका निर्माण करणार्‍या लघुग्रहांचा मागोवा घेणे सोपे होईल.

सुपरनोव्हाचा अभ्यास : तार्‍यांचा स्फोट होण्याच्या अगदी सुरुवातीच्या क्षणांना शास्त्रज्ञ टिपू शकतील. डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी : या डेटाचा वापर करून विश्वातील ‘डार्क मॅटर’ आणि ‘डार्क एनर्जी’सारख्या अनाकलनीय गोष्टी समजून घेण्यास मदत होईल. रुबिन वेधशाळेची अलर्ट प्रणाली अशा वेळी सुरू झाली आहे, जेव्हा ही वेधशाळा वर्षाच्या उत्तरार्धात ‘लेगसी सर्व्हे ऑफ स्पेस अँड टाईम’ नावाचा 10 वर्षांचा कार्यक्रम सुरू करणार आहे. यात दक्षिण गोलार्धातील आकाशाचे दर काही रात्रींनी पूर्ण चित्रण करण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या डिजिटल कॅमेर्‍याचा वापर केला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news