

नवी दिल्ली ः आजकाल हेडफोन आणि इअरफोन वापरणं अगदी सामान्य झालं आहे. प्रवासात गाणी ऐकण्यासाठी, व्हिडीओ पाहण्यासाठी किंवा कॉल्ससाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे हेडफोन आणि इअरफोन वापरतात. बाजारात वायरवाले, वायरलेस, डोक्यावर घालणारे हेडफोनसुद्धा उपलब्ध आहेत. यामध्ये काही जण ब—ँडेड डिव्हाईस वापरतात, तर काही लोक लोकल हेडफोनवर समाधान मानतात. काही वेळा अशी सवय असते की, जर इअरफोन खराब झाला किंवा हरवला तर लोक फक्त एका कानात इअरफोन घालून ऐकतात. या सवयीमुळे अनेकांना प्रश्न पडतो की, ‘एक कान वापरून सतत ऐकणं सुरक्षित आहे का?’ किंवा ‘यामुळे कानात किंवा श्रवणशक्तीत काही समस्या येऊ शकते का?’
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, फक्त एका कानात संगीत ऐकणं हानिकारक नाही; पण त्यामध्ये आवाजाची तीव—ता जास्त असल्यास आणि वेळ खूप लांब असल्यास तो कान थकतो. आवाजाचा दाब वाढल्यामुळे दीर्घकाळानंतर श्रवणशक्ती कमी होण्याचा धोका निर्माण होतो. याशिवाय, दुसर्या कानावर आवाज न ऐकल्यामुळे मेंदूला समतोल ध्वनी संकेत मिळत नाहीत. त्यामुळे आवाज कुठून येत आहे, हे अचूक ओळखणं कठीण होतं. या परिस्थितीमुळे दिशाभान कमी होऊ शकतं आणि कानात किरकिर, गूंज किंवा त्रास जाणवू शकतो. सतत एकाच कानात ऐकले तर दीर्घकाळात श्रवणशक्तीत असंतुलनही निर्माण होऊ शकते. वैद्यकीय तज्ज्ञांच्या
सुरक्षितपणे संगीत ऐकण्यासाठी काही सोपे उपाय ः तासभर संगीत ऐकताना आवाज 60% पेक्षा जास्त ठेवू नका. जास्त वेळ संगीत ऐकताना दोन्ही कानात इअरफोन घालून ऐकणं श्रवणशक्ती सुरक्षित ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. प्रत्येक तासात किमान 5-10 मिनिटांचा ब्रेक घ्या. यामुळे कानांना विश्रांती मिळते. नॉईज कॅन्सलेशन हेडफोन वापरल्यामुळे बाहेरच्या आवाजामुळे आवाज वाढवण्याची गरज कमी होते. तज्ज्ञांचे म्हणणं आहे की, संगीत ऐकणं हा आनंददायी अनुभव आहे; पण कानांच्या आरोग्याची काळजी घेणं त्यापेक्षा महत्त्वाचं आहे. योग्य सवयी अंगीकारल्यास, तुम्ही संगीताचा पूर्ण आनंद घेऊ शकता आणि दीर्घकाळ तुमची श्रवणशक्ती सुरक्षित ठेवू शकता. एक कान वापरून संगीत ऐकणं काही प्रमाणात सुरक्षित असू शकतं; पण त्यासाठी आवाजाची पातळी नियंत्रित ठेवणे, ब—ेक घेणे आणि योग्य हेडफोन वापरणं आवश्यक आहे. यामुळे कानाला होणारा ताण कमी होतो तसेच मन व शरीर दोन्ही आनंदी राहतात.