O'Neill Colonies | अवकाशात शहरं वसवणार की माणूस मंगळावर राहणार?

O'Neill Colonies |
O'Neill Colonies | अवकाशात शहरं वसवणार की माणूस मंगळावर राहणार?
Published on
Updated on

लॉस एंजलिस : मानवजातीने आकाशाकडे पाहत स्वप्नं रंगवण्याची परंपरा शतकानुशतके कायम आहे. मात्र, आता ही स्वप्नं प्रत्यक्षात उतरवण्याचा काळ जवळ आला आहे. अंतराळात मानवाचे वास्तव्यात रूपांतर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत आणि या स्पर्धेत दोन दिग्गज उद्योगपती आघाडीवर आहेत एलॉन मस्क आणि जेफ बेझोस.

मस्क यांची द़ृष्टी स्पष्ट आहे. मंगळ ग्रहावर स्वयंपूर्ण मानवी वसाहत उभी करणे. त्यांच्या कंपनी एस्पेसक्समार्फत ‘स्टारशीप’ रॉकेटच्या साहाय्याने पुढील काही वर्षांत मंगळावर मानव पाठवण्याची योजना आहे. भविष्यात मंगळाचे ‘टेराफॉर्मिंग’ करून तो पृथ्वीसारखा बनवण्याचेही त्यांचे स्वप्न आहे. दुसरीकडे बेझोस यांची भूमिका थोडी वेगळी आहे. त्यांची कंपनी ब्ल्यू ओरिजिन पृथ्वीच्या जवळच अवकाशात विशाल ‘ओ नेल कॉलनीज’ उभारण्यावर भर देते. या फिरत्या अवकाश-स्थानकांमध्ये लाखो लोक राहू शकतील, काम करू शकतील, तर पृथ्वी फक्त राहण्यासाठी आणि पर्यटनासाठी राखून ठेवली जाईल.

या दोन्ही संकल्पनांसमोर प्रचंड तांत्रिक अडचणी आहेत. मंगळावर जीवन टिकवणे, तेथील वातावरण मानवासाठी अनुकूल बनवणे हे अजूनही अनिश्चित आहे. तसेच अवकाशात मोठ्या प्रमाणावर वसाहती उभारण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान अद्याप पूर्णपणे विकसित झालेले नाही.

याशिवाय पर्यावरणीय आणि नैतिक प्रश्नही उपस्थित होतात. पृथ्वीवरील हवामान बदलाच्या संकटात जग झुंज देत असताना, अवकाशात वसाहती उभारण्यावर खर्च करणे योग्य आहे का, असा प्रश्न तज्ज्ञ उपस्थित करतात. नासासारख्या संस्थांनी आता खासगी कंपन्यांशी हातमिळवणी केली आहे. ‘आर्टेमिस’ मोहिमेसारख्या प्रकल्पांमध्ये स्पेस एक्स आणि ब्ल्यू ओरिजिन या कंपन्यांना महत्त्वाची भूमिका देण्यात आली आहे. यामुळे अंतराळ संशोधनात खासगी क्षेत्राचा प्रभाव झपाट्याने वाढत आहे. शेवटी, अंतराळातील भविष्य कितीही आकर्षक असले तरी पृथ्वीचे महत्त्व कमी होणार नाही. कारण, जिथे जीवनाची सुरुवात झाली, ती पृथ्वीच मानवासाठी सर्वात सुरक्षित आणि अनमोल घर राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news