Smart recording glasses | जे पाहाल ते रेकॉर्ड करणारा अनोखा चष्मा!

पंतप्रधानांनीही पाहिला भारतीय बनावटीचा ‘एआय चष्मा’
Smart recording glasses |
Smart recording glasses | जे पाहाल ते रेकॉर्ड करणारा अनोखा चष्मा!
Published on
Updated on

नवी दिल्ली : भारताने आधुनिक तंत्रज्ञानाच्या या लाटेत सक्रिय सहभाग घेतला असून, जागतिक स्तरावर सध्या देश उल्लेखनीय कामगिरी करताना दिसत आहे. याचीच प्रचिती आली, एआय समिटमध्ये. इथं आणि यासह अनेक स्तरांवर सध्या ‘सर्वम एआय’ची बरीच चर्चा सुरू असून, काही दिवसांपूर्वी याच भारतीय बनावटीच्या एआय मॉडेलनं ‘ओपन एआय’च्या ‘चॅटजीपीटी’ आणि ‘गुगल जेमिनी’ला मागे टाकले होते. आता हीच कंपनी पहिले हार्डवेअर डिव्हाईस जगापुढे आणत असून त्याची पहिली झलकही समोर आली आहे.

‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नुकता एक फोटो समोर आला असून, कंपनीचे प्रमुख प्रत्युष कुमार यांनीच हा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी कंपनीकडून आगामी काळात लाँच केल्या जाणार्‍या या प्रोडक्टची झलकही सर्वांसमोर आणली. ‘एआय इम्पॅक्ट समीट’ सुरू असतानाच एक अफलातून प्रोडक्ट जगासमोर आणणार्‍या या कंपनीनं संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं आहे. एका व्हिडीओच्या माध्यमातून प्रत्युष यांनी या स्मार्ट ग्लासेस अर्थात स्मार्ट चष्म्याची झलक दाखवली आहे. Sarvam Kaze असं या प्रोडक्टचं नाव असून, ते काहीसं मेटाच्या Meta RayBan सारखीच त्याची रचना आहे. हा स्मार्ट चष्मा वापरणारी पहिलीच व्यक्ती म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

कंपनीच्या प्रमुखांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार हा स्मार्ट चष्मा पूर्णपणे भारतीय बनावटीचा असून ‘एआय’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेला मोबाईल किंवा संगणकाच्या स्क्रीनपुरता सीमित न ठेवता दैनंदिन जीवनाताही एक भाग करणं हा यामागचा मुख्य हेतू असल्याचं कुमार यांनी स्पष्ट केलं. प्रत्युष कुमार यांच्या माहितीनुसार ‘हा चष्मा तुम्ही लावता तेव्हा, तो तुमचं ऐकतो, तुम्हाला समजून घेतो आणि तुम्हाला उत्तरंही देतो. तुम्ही जे पाहता ते रेकॉर्ड करतो. बरं यातून तुम्ही तुम्हाला हवा तो अनुभवही तयार करू शकता.’ राहिला मुद्दा ही कमाल गोष्ट लाँच कधी होणार, तर 2026 मध्येच मे महिन्यात हा चष्मा लाँच केला जाणार असून, ते इनहाऊस ‘एआय’ मॉडेलवर काम करेल. दरम्यान, इतकी चर्चा असली तरीही अद्याप या स्मार्ट चष्म्याची किंमत मात्र समोर आली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news