Grey Clay Sculpture : दोन हजार वर्षांपूर्वीचे ‘जिवंत‌’ वाटणारे शिल्प

मातीच्या शिल्पातून उलगडला दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास
Grey Clay Sculpture
Grey Clay Sculpture
Published on
Updated on

न्यूयॉर्क ः सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी कोलंबिया आणि इक्वेडोरच्या भागात राहणाऱ्या ‌‘टुमाको-टोलिटा‌’ संस्कृतीतील कुंभारांनी आपल्या वडीलधाऱ्या लोकांची अत्यंत जिवंत वाटणारी (वास्तववादी) शिल्पे साकारली होती. न्यूयॉर्कमधील ‌‘मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट‌’मध्ये प्रदर्शित करण्यात आलेले एका वृद्ध व्यक्तीचे हे शिल्प सध्या जागतिक आकर्षणाचे केंद्र ठरत असून, त्या काळातील प्रगत कला आणि संस्कृतीवर प्रकाश टाकत आहे.

हे शिल्प सुमारे 25 इंच (63.5 सेंटिमीटर) उंच असून, ते राखाडी रंगाच्या मातीपासून बनवलेले आहे. या शिल्पाचे बारकावे थक्क करणारे आहेत. चेहऱ्यावरील खोल सुरकुत्या, डोळ्यांखालील सैल झालेली त्वचा, मोजकेच दात आणि हनुवटीवरील खुंटलेली दाढी यांमुळे हे शिल्प हुबेहूब माणसासारखे वाटते. या व्यक्तीचे डोके वरून चपटे दाखवण्यात आले आहे. पुरातत्त्वशास्त्रज्ञ ह्युगो इकेहारा-त्सुकायामा यांच्या मते, ही त्या काळातील एक सांस्कृतिक प्रथा होती.

बालपणातच कवटीचा आकार बदलून आपली वांशिक ओळख किंवा सामाजिक स्थान (पद) दर्शवले जात असे. शिल्पाच्या नाकात, कानात आणि स्तनाग््राांवर लहान छिद्रे आहेत. यावरून असे समजते की, मूळ स्वरूपात हे शिल्प सोन्याच्या अलंकारांनी मढवलेले असावे. हे शिल्प एका स्टुलवर बसलेल्या स्थितीत दाखवले आहे, जे प्राचीन अमेरिकेत अधिकाराचे प्रतीक मानले जात असे. ही व्यक्ती एखादा धार्मिक गुरू किंवा ‌‘शमन‌’ असावी, जो मानवाचा अलौकिक शक्तींशी संपर्क करून देण्याचे काम करत असे. या वृद्धाचा कणा आणि कोरडी त्वचा ‌‘इग्वाना‌’ (सरड्याचा एक प्रकार) सारखी दिसते. असे मानले जाते की, प्राण्यांशी असलेले हे साधर्म्य शमनच्या ‌‘दैवी शक्ती‌’चे प्रतीक असावे. प्राचीन अमेरिकन समाजात धार्मिक आणि धर्मनिरपेक्ष सत्ता असलेल्या पुरुष नेत्यांना ‌‘कासिक‌’ म्हटले जात असे. हे शिल्प अशाच एका नेत्याचे असण्याची शक्यता आहे. इक्वेडोरमधील सॅन फ्रान्सिस्को विद्यापीठाचे पुरातत्त्वशास्त्रज्ञ फ्लोरेन्सिओ डेलगाडो एस्पिनोझा यांच्या मते, हे शिल्प महत्त्वाच्या धार्मिक विधींमध्ये प्रदर्शित केले जात असावे किंवा मिरवणुकीत नेले जात असावे. जरी या शिल्पाचे नेमके कार्य अद्याप गुपित असले, तरी कोलंबिया आणि इक्वेडोरच्या प्रदेशातील बसलेल्या नेत्याचे हे सर्वात जुने ज्ञात चित्रण मानले जाते. हे शिल्प बनवण्यासाठी अनेक दिवस लागले असावेत आणि प्राचीन काळी ते रंगवलेले व पॉलिश केलेले असावे, मात्र, काळाच्या ओघात त्याचा रंग उडून गेल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news