Ancient Human Relatives | सैबेरियातील गुहेत 10 हजार वर्षांच्या अंतरावरील दोन ‘नातेवाईक’

Ancient Human Relatives |
Ancient Human Relatives | सैबेरियातील गुहेत 10 हजार वर्षांच्या अंतरावरील दोन ‘नातेवाईक’
Published on
Updated on

मॉस्को : रशियातील अल्ताई पर्वतरांगांमधील ‘डेनिसोवा’ गुहेत सापडलेल्या 1 लाख 10 हजार वर्षे जुन्या हाडाच्या तुकड्याने मानवी उत्क्रांतीच्या इतिहासातील अनेक गुपिते उघड केली आहेत. या छोट्याशा अवशेषावरून शास्त्रज्ञांनी निएंडरथल मानवाचा चौथा ‘पूर्ण जीनोम’ तयार करण्यात यश मिळवले असून, हे मानव हजारो वर्षे कशा प्रकारे विलग आणि छोट्या समूहात राहत होते, याचे पुरावे मिळाले आहेत.

‘पीएनएएस’ या नियतकालिकात सोमवारी (23 मार्च) प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, 1 लाख 10 हजार वर्षे जुना हाडाचा तुकडा ‘डी17’ नावाच्या एका पुरुष निएंडरथलचा आहे. संशोधकांनी याची तुलना त्याच गुहेत सापडलेल्या 1 लाख 20 हजार वर्षे जुन्या ‘डी5’ नावाच्या स्त्री निएंडरथलच्या जीनोमशी केली. या अभ्यासात असे दिसून आले की, जरी ‘डी5’ ही ‘डी17’ ची थेट पूर्वज नसली, तरी हे दोन्ही निएंडरथल एकाच पूर्वजापासून विकसित झालेल्या जवळच्या उपशाखांमधील होते. 10 हजार वर्षांचा काळ लोटूनही त्यांच्यातील हे नाते अल्ताई प्रदेशात निएंडरथल मानवाचा प्रदीर्घ काळ वावर असल्याचे सिद्ध करते.

या संशोधनातून निएंडरथल मानवाच्या सामाजिक रचनेबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे : हे मानव 50 पेक्षा कमी व्यक्तींच्या अत्यंत छोट्या आणि विलग समूहात राहत असत. संशोधकांना त्यांच्या डीएनएमध्ये ‘इनब्रीडिंग’चे (एकाच कुटुंबात किंवा जवळच्या नात्यात होणारे प्रजनन) प्रबळ खुणा आढळल्या. विश्लेषण केलेल्या व्यक्तींच्या पालकांमध्ये चुलत भावंडांइतके जवळचे नाते असावे, असे डीएनए रचनेवरून स्पष्ट होते.

हे समूह हजारो वर्षे जगापासून तुटलेले होते. निएंडरथल 34,000 वर्षांपूर्वी नामशेष होण्यामागे हे अतिविलगीकरण आणि इनब्रीडिंग ही प्रमुख कारणे मानली जातात. येल स्कूल ऑफ मेडिसिनमधील अनुवंशशास्त्राचे प्राध्यापक दियेन्दो मसिलीनी यांच्या मते, अल्ताई भागातील निएंडरथल हे युरोपमधील निएंडरथलपेक्षा पूर्णपणे वेगळे होते. भौगोलिकद़ृष्ट्या जवळ असूनही पूर्व आणि पश्चिम युरेशियामधील या मानवी समूहांच्या जनुकीय रचनेत अल्पावधीतच मोठा फरक पडला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news