Flying Dinosaurs | 15 कोटी वर्षांपूर्वीच्या वादळात दोन उडणारे डायनासोर गेले बळी

जीवाश्मांवरून झाले संशोधन
two-flying-dinosaurs-killed-in-150-million-year-old-storm
Flying Dinosaurs | 15 कोटी वर्षांपूर्वीच्या वादळात दोन उडणारे डायनासोर गेले बळी
Published on
Updated on

बर्लिन : जर्मनीमध्ये सापडलेल्या आश्चर्यकारक जीवाश्मांमुळे दोन लहान व आकाशात उडणारे डायनासोर 15 कोटी वर्षांपूर्वी एका वादळात उडत असतानाच मृत्युमुखी पडल्याचे समोर आले आहे. संशोधकांनी जर्मनीतील ज्युरासिक काळातील या दोन टेरोसॉरच्या सांगाड्यांची तपासणी (नेक्रॉप्सी) केली. या तपासणीतून असे दिसून आले की, जोरदार वार्‍यामुळे हे उडणारे सरपटणारे प्राणी एका तलावात पडले आणि वादळाच्या लाटांमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला.

हे जीवाश्म टेरोडॅक्टिलस अँटिक्वस (Pterodactylus antiquus) या पहिल्या टेरोसॉर प्रजातीचे आहेत, ज्यावरून ‘टेरोडॅक्टिल‘ हे टोपणनाव प्रचलित झाले. हे दोन्ही नवजात टेरोसॉर सापडलेल्या सर्वात लहान नमुन्यांपैकी आहेत. त्यांचा पंखांचा विस्तार सुमारे 8 इंच (20 सेंटीमीटर) होता, जो एका लहान वटवाघळाएवढा असतो. ‘करंट बायोलॉजी’ जर्नलमध्ये 5 सप्टेंबर रोजी प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार, या भागात वादळामुळे अनेक लहान टेरोसॉरचा सामूहिक मृत्यू झाला असावा.

प्रौढ टेरोडॅक्टिलस अँटिक्वसचा पंखांचा विस्तार सुमारे 3.5 फूट (1.1 मीटर) होता, त्यामुळे ते जोरदार वार्‍यांना प्रतिकार करू शकले असावेत. संशोधकांनी या लहान टेरोसॉरना ‘लकी’ आणि ‘लकी II’ अशी टोपणनावे दिली आहेत. वादळात सापडून मरण पावले हे त्यांचे दुर्दैव; पण त्यांचे नाजूक सांगाडे सापडले हे वैज्ञानिकांचे मोठे सुदैव. ‘टेरोसॉरचे सांगाडे अत्यंत हलके होते. त्यांची पोकळ आणि पातळ हाडे उडण्यासाठी योग्य असली तरी ती जीवाश्म म्हणून टिकून राहण्यासाठी खराब असतात’, असे या अभ्यासाचे प्रमुख लेखक रॅब स्माइथ यांनी सांगितले. त्यामुळे त्यांचे जीवाश्म सापडण्याची शक्यता कमी असते आणि प्राण्याचा मृत्यू कसा झाला हे सांगणारे जीवाश्म तर त्याहूनही दुर्मीळ आहेत, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news