Rome Ancient Tombs | रोममध्ये 2,400 वर्षे जुन्या दोन मोठ्या थडग्यांचा शोध

Rome Ancient Tombs |
Rome Ancient Tombs | रोममध्ये 2,400 वर्षे जुन्या दोन मोठ्या थडग्यांचा शोध
Published on
Updated on

रोम : इटलीची राजधानी असलेल्या आधुनिक रोम शहराच्या ईशान्य भागात, ‘व्हिया पिएत्रालाटा’ जवळ पुरातत्वशास्त्रज्ञांना रोमन प्रजासत्ताक काळातील दोन भव्य आणि उच्चभ्रू थडगी सापडली आहेत. ही थडगी अंदाजे 2,400 वर्षांहून अधिक जुनी असल्याचे सांगितले जात आहे.

एका दफन संकुलामध्ये ही दोन थडगी शेजारी-शेजारी आढळली आहेत. या जागेजवळ ग्रीक देव ‘हर्क्युलिस’चे एक मंदिर किंवा पवित्र स्थळ असल्याचेही पुरावे मिळाले आहेत. हर्क्युलिस हा प्राचीन रोमनांसाठी संरक्षणाचे प्रतीक मानला जात असे. या उत्खननात थडग्यांव्यतिरिक्त पुढील गोष्टी आढळल्या आहेत. प्राचीन रस्त्याचा एक भाग, दोन मोठे पाण्याचे हौद, ज्यांचा वापर धार्मिक विधींसाठी केला जात असावा. रोमच्या मुख्य पुरातत्त्व अधिकारी डॅनिएला पोरो यांनी सांगितले की, ‘रोमची उपनगरे ही सखोल आठवणींची भांडारे आहेत आणि त्यांचे संशोधन होणे अजून बाकी आहे.‘

या भागात प्राचीन वस्ती असल्याचे पुरावे 1990 च्या दशकात मिळाले होते, परंतु हर्क्युलिसच्या मंदिर परिसराचे प्रत्यक्ष उत्खनन 2022 मध्ये पुरातत्वशास्त्रज्ञ फॅब्रिझियो सांती यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले. उत्खननात काही ब्राँझची नाणी सापडली आहेत. त्यावरून हे ठिकाण इसवी सन पूर्व 5 व्या किंवा 4 थ्या शतकापासून (जेव्हा रोममध्ये प्रजासत्ताक व्यवस्था होती) ते इसवी सन 1 ल्या शतकापर्यंत (रोमन साम्राज्याचा काळ) वापरात असावे, असा अंदाज आहे. ही थडगी एखाद्या श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंबाची (ज्याला रोमन भाषेत ‘जेन्स’ म्हटले जाते) असावीत, असे फॅब्रिझियो सांती यांचे मत आहे. एका थडग्यात दगडाची शवपेटी आणि अस्थी कलश सापडले आहेत, तर दुसर्‍या थडग्यात एका प्रौढ पुरुषाचा सांगाडा आढळला आहे. काही माध्यमांनी हर्क्युलिसच्या सहा ब्राँझ मूर्ती सापडल्याचा दावा केला होता; परंतु इटलीच्या सांस्कृतिक मंत्रालयाने याचा इन्कार केला आहे. मंत्रालयानुसार, त्या ठिकाणी हर्क्युलिसचा एक मुख्य पुतळा होता, जो आता तिथे नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news