जगातील सर्वात मोठा अणुबॉम्ब कोणत्या देशाकडे आहे?

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील सीमावरील तणाव
tsar-bomba-worlds-largest-nuclear-bomb-russia
जगातील सर्वात मोठा अणुबॉम्ब कोणत्या देशाकडे आहे?Pudhari File Photo
Published on
Updated on

मॉस्को : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील सीमावरील तणाव शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देशांच्या अण्वस्त्रांच्या साठ्याबद्दल आणि अणुहल्ल्याच्या क्षमतेबद्दल देखील चर्चा सुरू आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, की जगातील सर्वात मोठा अणुबॉम्ब कोणत्या देशाकडे आहे आणि तो किती नुकसान करू शकतो? असा अणुबॉम्ब रशियाकडे असून त्याचे नाव ‘झार बोम्बा’ असे आहे. हा अणुबॉम्ब तब्बल 50 मेगाटनचा आहे.

भारताकडे अग्नी, शौर्य, प्रलय आणि ब्रह्मोससारख्या शक्तिशाली क्षेपणास्त्रांची मालिका आहे, जी अणुहल्ला करू शकतात. भारताकडे समुद्र, जमीन आणि आकाशातून अणुहल्ला करण्याची ताकद आहे. भारतासोबत अमेरिका, रशिया आणि चीन हेच केवळ न्यूक्लियर ट्रायड देश आहेत. अमेरिकेने ऑगस्ट 1945 मध्ये जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब हल्ला केला होता. या हल्ल्यात जवळपास 2 लाख लोक मरण पावले होते. या दोन अणुबॉम्बचे नाव लिटिल बॉय आणि फॅट मॅन होते. जगात 9 देश असे आहेत, ज्यांच्याकडे अण्वस्त्रे आहेत.

अमेरिकेने 1960 च्या दशकात पाच मेगाटन क्षमतेचा मिनी अणुबॉम्ब (हायड्रोजन बॉम्ब) तयार केला होता. याचा मिनी व्हर्जन अमेरिकेच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्रांसाठी (ICBM) तयार करण्यात आला होता. याचा वापर वॉरहेड म्हणून केला जातो आणि त्यामुळे चीनवर देखील मारा करता येऊ शकतो. रशियाचा अणुबॉम्बही जवळपास 50 वर्षे जुना असून त्याची ताकद 6 मेगाटन आहे. त्याचे अद्ययावत ‘बी’ व्हर्जन तयार झाले आहे. रशियाने पहिली अणुचाचणी ऑगस्ट 1953 मध्ये याच बॉम्बची केली होती. हा स्फोट जमिनीवर नव्हे तर वायुमंडलात करण्यात आला होता. अमेरिकन लष्कराकडे 7 मेगाटन क्षमतेचा अणुबॉम्ब आहे. हा अणुबॉम्ब 60,000 फूट उंचीवरून सुपरसोनिक वेगाने लाँच करता येतो.

रडारने शोधणे अत्यंत कठीण आहे. रशियाकडे सोव्हिएत काळातील 8 मेगाटनचा अणुबॉम्ब आहे. तो प्रचंड मजबूत बंकरसुद्धा उद्ध्वस्त करू शकतो. याला सार बोंबाचा मिनी व्हर्जन देखील म्हणतात. शीत युद्धाच्या काळात अमेरिकेने 340 पेक्षा अधिक असे बॉम्ब तयार केले होते. हा बॉम्ब 12 फूट लांब असून त्याचे वजन 4000 किलोहून अधिक आहे. त्याचे नवीन संस्करण बी 83 हा जगातील सर्वात शक्तिशाली बॉम्ब मानला जातो. अमेरिकेकडे थर्मोन्यूक्लिअर ग्रॅव्हिटी बॉम्ब TX-21 qln देखील आहे. हा अत्यंत शक्तिशाली अण्वस्त्र आहे. याची ताकद 15 मेगाटन आहे आणि तो 1950 मध्ये तयार करण्यात आला होता. मार्च 1954 मध्ये मार्शल आयलंडवर करण्यात आलेल्या अणुस्फोटात याचाच वापर झाला होता.

अमेरिकेकडे 25 मेगाटन क्षमतेचा दुसर्‍या क्रमांकाचा शक्तिशाली अणुबॉम्ब आहे. या बॉम्बचे अनेक व्हर्जन अमेरिकेने तयार केले आहेत. 65 वर्षांत अमेरिकेने याचे अनेक प्रकार तयार केले आहेत. जगातील सर्वात मोठा अणुबॉम्ब ‘झार बोम्बा’ (Tsar Bomba) रशियाकडे आहे. हा अणुबॉम्ब 50 मेगाटन क्षमतेचा आहे. इतक्या वजनाचा आणि तीव्रतेचा अणुबॉम्ब फुटला, तर एका मोठ्या शहराचा पूर्णपणे नाश होऊ शकतो. शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत संघाने 100 मेगाटन क्षमतेचा बॉम्ब तयार केला होता. पण त्याचा स्फोट पृथ्वीला धोका निर्माण करू शकतो हे लक्षात घेत त्याची ताकद 50 मेगाटनपर्यंत कमी करण्यात आली. झार बोम्बामध्ये 50 मेगाटन टीएनटीची ताकद आहे. 30 ऑक्टोबर 1961 रोजी याचा एक अणुस्फोट करण्यात आला, जो जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा अणुविस्फोट होता. अमेरिकेने हिरोशिमा शहरावर टाकलेला अणुबॉम्ब केवळ 15 किलो टनचा होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news