‘या’ झाडाला येतात 40 प्रकारची फळे!

Tree of 40 Fruits | पृथ्वीवर अशी फक्त 16 झाडे
‘या’ झाडाला येतात 40 प्रकारची फळे!
File Photo
Published on
Updated on

न्यूयॉर्क : जगभरात हजारो प्रकारची फळझाडे आहेत. एका झाडावर एकाच प्रकारचे फळ येते, म्हणजेच आंब्याच्या झाडाला आंबेच लागतात. पेरूच्या झाडाला पेरू, चिकूच्या झाला चिकू... मात्र एकाच झाडावर वेगवेगळ्या प्रकारची फळे आल्याचे कधी तुम्ही ऐकले आहे का? असे एक झाड आहे ज्याला एक-दोन नाही तर तब्बल 40 प्रकारची फळे येतात. पृथ्वीवर अशी फक्त 16 झाडे आहेत. जाणून घेऊया या अनोख्या झाडाविषयी. हे अनोखे झाड ‘ट्री ऑफ 40 फ्रूटस्’ या नावाने ओळखले जाते. ‘ट्री ऑफ 40 फू्र टस्’ हे झाड कृषी क्षेत्रातील चमत्कार आहे.

अमेरिकेतील सेराक्यूज युनिव्हर्सिटीमध्ये व्हिज्युअल आर्टस्चे प्राध्यापक सॅम वॅन एकेन हे या अनोख्या झाडाचे जनक आहेत. या अनोख्या झाडाची संकल्पना खूपच आश्चर्यकारक आहे. या झाडाची किंमतही तशीच आहे. या एका झाडाची किंमत तब्बल 19 लाख रुपये आहे. न्यूयॉर्कमधील सात राज्यात ‘ट्री ऑफ 40 फू्र टस्’ ची फक्त 16 झाडे आहेत. प्राध्यापक सॅम वॅन एकेन यांनी विज्ञानाच्या मदतीने या झाडाची निर्मिती केली आहे. न्यूयॉर्कमधील एका कृषी प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर त्यांना या झाडाची कल्पना सुचली. सन 2008 पासून त्यांनी झाडाच्या निर्मितीच्या प्रयोगाची तयारी सुरू केली. ग्राफ्टिंग टेक्निकच्या म्हणजेच कलम पद्धतीच्या मदतीने त्यांनी ‘ट्री ऑफ 40 फू्र टस्’ हे अद्भुत झाड तयार केले. ग्राफ्टिंग टेक्निकच्या माध्यमातून हे झाड तयार करण्यासाठी हिवाळ्यात एखाद्या झाडाची एक फांदी कळीसोबत तोडली जाते. नंतर ही फांदी मुख्य झाडात छिद्र करून लावली जाते. अशा प्रकारे त्यांनी तब्बल 40 प्रकारच्या झाडांच्या फांद्या जोडल्या आणि त्यांचा प्रयोग यशस्वी झाला. ‘ट्री ऑफ 40 फू्र टस्’ या झाडाला बोरं, चेरी, नेक्टराईन, खुबानी अशा फळांसह पेरूपर्यंत, ब्लॅकबेरी, केळी आणि सफरचंद देखील येतात!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news