

आपल्या पचनसंस्थेचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. जर पचनसंस्था बिघडली, तर पोटदुखी, अपचन, गॅस, उलटी, पोट फुगणे, जुलाब किंवा बद्धकोष्ठतेसारख्या समस्या निर्माण होतात. यामुळे थकवा, आळस आणि इतर त्रास देखील जाणवतो. त्यामुळे आतड्यांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. काही भाज्या या बाबतीत खूपच उपयुक्त ठरू शकतात, कारण त्या पोटात गेल्यानंतर लगेच कार्य करू लागतात. याबाबत आहारतज्ज्ञांनी दिलेली ही माहिती...
पालक, मेथी यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर फायबर, क्लोरोफिल आणि अँटीऑक्सिडंटस् असतात. या घटकांमुळे पचन सुधारते, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो, आतड्यात साचलेली जुनी घाण आणि टॉक्सिन्स दूर होतात.
पचन सुधारण्यासाठी फायबरचा भरपूर स्रोत म्हणजे गाजर. गाजरात असलेले फायबर पचनक्रिया सुरळीत ठेवते, मल सैल करून सहज बाहेर टाकण्यास मदत करते आणि आतड्यांवरचा ताण कमी करते.
ही सुद्धा नैसर्गिक डिटॉक्स सुलभ करणारी भाजी आहे. कोबीमध्ये सल्फर आणि फायबर मुबलक प्रमाणात असते. ही संयुगे आतड्यातील घाण सहजपणे बाहेर टाकतात. विशेषतः थोडीशा शिजवलेल्या कोबीची भाजी शरीरातील टॉक्सिन्स काढून टाकण्यात अधिक प्रभावी ठरते.