‌Work From Home : ‘वर्क फ्रॉम होम‌’बाबत आघाडीचे देश कोणते? जाणून घ्या

'या' देशात वर्क-फ्रॉम-होम मॉडेलचा सर्वाधिक होतो वापर
‌Work From Home
‌Work From HomeNeha Choudhary
Published on
Updated on

नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमधील भाषणात भारतीयांना घरून काम करण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर ‌‘वर्क फ ॉम होम‌’ मॉडेलवरील मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. तुम्हाला माहितीये का, वर्क फ्रॉम होममध्ये जगात कोणते देश सर्वाधिक आघाडीवर आहेत?

कोरोना काळात भारतात वर्क फ्रॉम होम मोठ्या प्रमाणात झाले होते. पण, कोरोना संकट ओसरल्यानंतर भारतात वर्क फ्रॉम होम कमी झाले. आता पुन्हा एकदा मोदींनी वर्क फ्रॉम होम करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलची बचत करण्यासाठी भारतीयांनी घरून काम करावे. या युद्धामुळे अनेक देशांनी भारतापूर्वीच आपल्या नागरिकांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितलेले आहे.

अनेक देशांमध्ये परिस्थितीनुसार कंपन्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देतात. आता जगातील पाच देशांबद्दल जाणून घेऊया जिथे वर्क-फ्रॉम-होम मॉडेलचा सर्वाधिक वापर होतो. Global WFH Trends च्या आकडेवारीनुसार नेदरलँडस्‌‍ या देशातील लोक सर्वाधिक घरून काम करतात. त्यांना ऑफिसमध्ये जाऊन काम करण्याची गरज पडत नाही. आकडेवारीनुसार इथे 52 टक्के कर्मचारी हे दररोज घरूनच काम करतात. त्यानंतर दुसरा नंबर लागतो तो कॅनडा या देशाचा. इथे 43 टक्के लोक घरून काम करतात. लांबचा प्रवास, प्रतिकूल हवामान आणि प्रमुख शहरांपासूनचे अंतर यामुळे इथे असलेल्या कंपन्यांना रिमोट वर्कचा मोठ्या प्रमाणात उपयोग करतात. या दोन देशांच्या पाठोपाठ नंबर लागतो तो म्हणजे यूकेचा. इथे जवळपास 38 टक्के कर्मचारी हायबीड मॉडेलला प्राधान्य देतात. इथल्या सरकारने आणि कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना लवचिक कामावर भर दिला आहे. यानंतर 25 टक्के लोक जर्मनीमध्ये घरून काम करतात.

जर्मनीमध्ये विशेषतः आयटी, तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रांमध्ये वेगाने वर्क फ्रॉम होमला पसंती दिली जातेय. जर्मनीमध्ये, कंपन्या आता कार्यालयाची जागा कमी करत असून, डिजिटल कार्यप्रणालींमध्ये अधिक गुंतवणूक करण्यावर भर देत आहेत. आता भारताबद्दल बोलायचे झाले तर कोरोना काळात सर्वाधिक कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम केले होते. त्यानंतर सध्याची स्थिती सांगायची झाली तर 10 टक्क्यांपेक्षा अधिक लोक नियमितपणे घरून काम करतात. आयटी आणि काही बहुराष्ट्रीय कंपन्यांपुरते वर्क फ्रॉम होम मर्यादित आहे. उत्पादन क्षेत्र, सरकारी विभाग आणि पारंपरिक कंपन्यांमध्ये कार्यालयीन संस्कृतीवरच जोर दिला जातोय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news