Highest paying countries | ‘हे’ सात देश देतात सर्वाधिक पगार

Highest paying countries |
Highest paying countries | ‘हे’ सात देश देतात सर्वाधिक पगार
Published on
Updated on

उत्तम करिअर आणि लठ्ठपगाराची नोकरी मिळावी, हे प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते. यासाठी अनेकदा उच्च शिक्षण घेऊन लोक परदेशातील संधींकडे वळतात. जर तुम्हीही अशा संधीच्या शोधात असाल, तर जगात असे काही देश आहेत जे कर्मचार्‍यांना सर्वाधिक वेतन देण्यासाठी ओळखले जातात. जाणून घेऊया अशा सात देशांबद्दल, जिथे पगाराचे आकडे थक्क करणारे आहेत....

लक्झेंबर्ग : युरोपमधील हा छोटासा देश पगार देण्याच्या बाबतीत जगात नंबर 1 वर आहे. ‘स्टॅटिस्टा’च्या अहवालानुसार, येथे सरासरी मासिक पगार 5.98 लाख रुपयांपर्यंत असतो. हा देश युरोपचे प्रमुख ‘फायनान्शिअल हब’ मानले जाते. येथे बँकिंग आणि इन्व्हेस्टमेंट क्षेत्रात सर्वाधिक संधी आहेत.

स्वित्झर्लंड : निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेला स्वित्झर्लंड सर्वाधिक पगार देणार्‍या देशांच्या यादीत दुसर्‍या क्रमांकावर आहे. येथे दरमहा साधारण 5.68 लाख रुपये पगार मिळू शकतो. फार्मा, बँकिंग आणि टेक इंडस्ट्रीमध्ये येथे करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत.

सिंगापूर : आशियाचे ‘फायनान्शिअल हब’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या सिंगापूरमध्ये अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत. येथे सरासरी मासिक पगार 4.30 लाख रुपयांच्या आसपास असतो.

अमेरिका : टेक आणि फायनान्स क्षेत्रातील नोकर्‍यांसाठी अमेरिका हे भारतीयांचे आवडते ठिकाण आहे. अमेरिकेत दरमहा साधारण 3.83 लाख रुपये इतका सरासरी पगार दिला जातो.

आईसलँड : युरोपमधील आईसलँड हा देश पर्यटन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. येथे नोकरी करणार्‍यांना दरमहा सुमारे 3.84 लाख रुपयांपर्यंत वेतन मिळू शकते.

संयुक्त अरब अमिराती - युएई : दुबई आणि अबुधाबी यांसारख्या शहरांमुळे युएईमध्ये पर्यटन आणि रिअल इस्टेट क्षेत्रात नोकर्‍यांची मोठी मागणी असते. येथे दरमहा सरासरी 3.36 लाख रुपये पगार मिळू शकतो. विशेष म्हणजे, येथे अनेक क्षेत्रांत करमुक्त पगाराची सुविधा मिळते.

डेन्मार्क : जगातील सर्वात आनंदी देशांपैकी एक असलेल्या डेन्मार्कचाही या यादीत समावेश आहे. येथे दरमहा सुमारे 3.19 लाख रुपये पगार मिळतो. फार्मा आणि शिपिंग इंडस्ट्रीमध्ये येथे रोजगाराच्या अधिक संधी आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news