Shocking medical case
Shocking medical case: पोटातून काढले टूथब्रश आणि पानाPudhari

Shocking medical case: पोटातून काढले टूथब्रश आणि पाना

मात्र जयपूरमधील एका खासगी रुग्णालयात नुकतीच झालेली शस्त्रक्रिया पाहून अनुभवी डॉक्टरही चक्रावून गेले
Published on

जयपूर : वैद्यकीय क्षेत्रात अनेकदा थक्क करणाऱ्या घटना समोर येत असतात, मात्र जयपूरमधील एका खासगी रुग्णालयात नुकतीच झालेली शस्त्रक्रिया पाहून अनुभवी डॉक्टरही चक्रावून गेले आहेत. एका 26 वर्षीय तरुणाच्या पोटात चक्क सात टूथबश आणि दोन ‌‘पाने‌’ अडकले होते. तब्बल दोन तासांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर हे साहित्य बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, भिलवाडा येथील रहिवासी असलेला हा तरुण 26 डिसेंबर रोजी तीव पोटदुखीच्या तक्रारीमुळे रुग्णालयात दाखल झाला होता. त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. ज्येष्ठ गॅस्ट्रो सर्जन डॉ. तन्मय पारीक यांनी तपासणी केली असता, सोनोग््रााफी अहवालात पोटात काही धातूच्या आणि प्लास्टिकच्या वस्तू असल्याचे निदर्शनास आले. सुरुवातीला एंडोस्कोपीद्वारे या वस्तू काढण्याचा प्रयत्न झाला, मात्र वस्तूंचा आकार आणि त्यांचे स्वरूप पाहता तो प्रयत्न यशस्वी झाला नाही.

अखेर डॉक्टरांनी ‌‘ओपन सर्जरी‌’ करण्याचा धाडसी निर्णय घेतला. डॉ. पारीक यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. आलोक वर्मा आणि त्यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया पूर्ण केली. या तरुणाची मानसिक स्थिती स्थिर नसल्याने त्याने या वस्तू गिळल्या असाव्यात, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याच्या मानसिक आरोग्यावरही उपचार केले जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news