Gold Toilet | खासगी विमानापेक्षाही महाग कमोड!

Gold Toilet
Gold Toilet | खासगी विमानापेक्षाही महाग कमोड!
Published on
Updated on

वॉशिंग्टन ः शौचालय हा घराचा एक अत्यावश्यक भाग असतो. पण, तुम्ही कधी कल्पना केली आहे का, की एका शौचकुपाची म्हणजेच कमोडची किंमत एखाद्या आलिशान हवेली किंवा खासगी जेटपेक्षा जास्त असू शकते? होय, हे खरं आहे! जगातील सर्वात महागडे कमोड सध्या लिलावासाठी उपलब्ध आहे. हे कमोड सामान्य नसून, 100 किलो वजनाचे शुद्ध सोन्यापासून बनवलेले एक अनोखे कमोड आहे. ज्याची किंमत ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.

या मौल्यवान कमोडचे नाव चक्क ‘अमेरिका’ असे आहे. हे प्रसिद्ध इटालियन कलाकार मॉरिजिओ कॅटेलन यांनी तयार केलेल्या एका खास कलाकृतीचे हे नाव आहे. हे कमोड 18 कॅरेट सोन्यापासून बनवलेले असून, त्याचे अंदाजित वजन 101.02 किलोग्रॅम म्हणजेच 223 पौंड इतके आहे. या कमोडची सुरुवातीची बोली 10 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच अंदाजे 88 कोटी रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. 8 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या लिलावात जगभरातील श्रीमंत व्यक्तींमध्ये ते विकत घेण्यासाठी तीव— स्पर्धा सुरू झाली आहे.

बहुतांश कलाकृती केवळ सजावटीसाठी असतात; पण ‘अमेरिका’च्या बाबतीत तसे नाही. हे घन सोन्याचे कमोड पूर्णपणे कार्यरत आहे. म्हणजेच ते सामान्य कमोडप्रमाणे वापरले जाऊ शकते. हे कमोड केवळ ऐशोरामाचे प्रतीक नाही, तर समाजातील संपत्ती आणि संसाधनांच्या मूल्यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण करते. कलाकाराने हे कमोड श्रीमंती आणि मूलभूत गरज यातील अंतर अधोरेखित करणारे व्यंग्य म्हणून सादर केले आहे.

हे कमोड केवळ त्याच्या प्रचंड किमतीमुळेच नाही, तर एका वेगळ्या कारणामुळेही चर्चेत आहे. हे कमोड 2019 मध्ये इंग्लंडमधील ब्लेनहाइम पॅलेसमधून चोरीला गेलेल्या सोन्याच्या कमोडसारखेच आहे. त्यावेळी, ऐतिहासिक राजवाड्यातून सोन्याचे कमोड चोरीला गेल्यामुळे ही घटना जगभर गाजली होती. आता, न्यूयॉर्कमध्ये अशाच प्रकारचे कमोड लिलावासाठी उपलब्ध असल्याने त्याबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news