

नवी दिल्ली : पृथ्वीवर अशी अनेक ठिकाणं आहेत जिथं वेळा एकसारख्या नाहीत. एकट्या भारतातसुद्धा या वेळांमध्ये काहीसा फरक दिसून येतो. त्याचप्रमाणं ग्रहांवरील वेळाचं हे चक्रसुद्धा प्रचंड कुतूहलपूर्ण आणि सातत्यानं बदलणारं आहे. जाणून आश्चर्य वाटेल, पण पृथ्वीचा शेजारी ग्रह मंगळ हा तुलनेनं जीवसृष्टी असणार्या या ग्रहाहून वेगानं पुढे जातो. थोडक्यात मंगळावर घड्याळ ‘धावतं’ असं म्हणणं गैर ठरणार नाही.
हे तर्कवितर्क नसून, महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी दशकांपूर्वी यासंदर्भातील उलगडा करणारे काही सिद्धांत मांडले होते. नव्या संशोधनानुसार घड्याळाच्या आधारे वेळ निर्धारित करायचा झाल्यास पृथ्वीच्या तुलनेत मंगळावरव घड्याळ वेगानं धावतं. त्यामुळं येत्या काळातील अवकाश मोहिमांसाठी हे एक आव्हान म्हटलं जात आहे. ‘द अॅस्ट्रॉनॉमिकल जर्नल’ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालातील संदर्भ आणि संशोधकांच्या निरीक्षणानुसार मंगळावर दर 24 तासांमध्ये पृथ्वीच्या तुलनेत सरासरी 0.477 मिलीसेकंदानं (477 मायक्रोसेकंद) इतक्या फरकानं वेळ पुढे धावतो.
ऐकण्यास ही आकडेवारी फार कमी वाटत असेल. कारण, हा सेकंदाचा 1000 वा भागसुद्धा नाही. मात्र संशोधन क्षेत्रात आणि प्रामुख्यानं अवकाश मोहिमांसाठी मात्र हा फरक फार महत्त्वाचा आहे. ‘नेविगेशन’ आणि कम्युनिकेशनसाठी वेळ अगदी अचूक असणं फार महत्त्वाचं असतं. यामध्ये लहानसा फरक जरी पडला करीही अवकाशयान मूळ मार्गापासून भरकटू शकतं. ज्यामुळं संशोधकांच्या माहितीनुसार हे अंतर जाणून घेणं या कारणासाठीसुद्धा महत्त्वाचं आहे, जिथं भविष्यात संपूर्ण सूर्यमालेत एकच ‘इंटरनेट’ सुरू करता येऊ शकतं. पृथ्वी आणि मंगळावरील वेळेमध्ये हा फरक का? या प्रश्नाचं उत्तर अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या ‘जनरल रिलेटिविटी’ या पुस्तकात पाहायला मिळतं.
आईन्स्टाईन यांच्या मते वेळ हा गुरुत्वाकर्षणावर आधारित असून, जिथं गुरुत्वाकर्षण अधिक असतं, तिथं वेळ धीम्या गतीनं चालतो आणि गुरुत्वाकर्षण कमी असतं तिथं वेळ अक्षरश: वेग धारण करतो. उदाहरणार्थ, जे जीव समुद्रासपाटीवर राहतात, त्यांच्या तुलनेत पर्वतीय भागांमध्ये राहणार्यांसाठी वेळ थोडा वेगानं चालतो. कारण, पृथ्वीच्या उंचावरील भागांमध्ये गुरुत्वाकर्षणाचा परिणाम तुलनेनं कमी होत जातो. मंगळाची तरलता (Liquidity) पृथ्वीहून कमी असून, तिथं गुरुत्वाकर्षणही कमी आहे ज्यामुळं तिथं वेळ वेगानं पुढे जातो.