King Tutankhamun: तीन हजार वर्षांपूर्वीची राजा तुतानखामेनची लाकडी पादत्राणे

इजिप्तचा प्रसिद्ध तरुण फॅरो (राजा) तुतानखामेन याच्या थडग्याचा शोध लागल्याला आता शंभर वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, तरीही त्यातून मिळणाऱ्या वस्तू जगाला थक्क करत आहेत
King Tutankhamun=
King Tutankhamun: तीन हजार वर्षांपूर्वीची राजा तुतानखामेनची लाकडी पादत्राणेPudhari
Published on
Updated on

कैरो : इजिप्तचा प्रसिद्ध तरुण फॅरो (राजा) तुतानखामेन याच्या थडग्याचा शोध लागल्याला आता शंभर वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, तरीही त्यातून मिळणाऱ्या वस्तू जगाला थक्क करत आहेत. 1922 मध्ये बिटिश पुरातत्त्व शास्त्रज्ञ हॉवर्ड कार्टर आणि स्थानिक इजिप्शियन कामगारांनी जेव्हा या थडग्याचा शोध लावला, तेव्हा त्यांना हजारो कलाकृती आढळल्या. त्यामध्ये राजाला मृत्यूनंतरच्या प्रवासात लागणाऱ्या अनेक वस्तू होत्या, ज्यात डझनभर पादत्राणांच्या जोड्यांचा समावेश होता. मात्र, त्यातील एका विशिष्ट लाकडी चपलांच्या जोडीने संशोधकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हॉवर्ड कार्टर यांच्या मूळ नोंदीनुसार, या चपलांची लांबी 28.4 सें.मी. आणि रुंदी 9.2 सें.मी. आहे. आजच्या काळात विचार केला, तर हा आकार साधारणपणे 11.5 (ण.ड. ीळूश) इतका मोठा आहे. या चपला लाकडापासून बनवलेल्या असून, त्यावर झाडाची साल, हिरवे कातडे आणि पांढऱ्या रंगाच्या थरावर सोन्याच्या वर्खाचे नक्षीकाम करण्यात आले आहे. या चपलांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या तळव्यावर असलेले कोरीव काम.

दोन्ही चपलांच्या मध्यभागी कमळ आणि पॅपिरस वनस्पतीने बांधलेल्या दोन शत्रू कैद्यांची चित्रे आहेत. प्रत्येक चपलेवर पायाच्या बोटांजवळ चार आणि टाचेजवळ चार अशी एकूण आठ धनुष्ये आणि एक धनुष्याच्या आकाराचा बंद आहे. प्राचीन इजिप्तमध्ये ‌‘नऊ धनुष्य‌’ हे इजिप्तच्या सर्व शत्रूंचे एकत्रित प्रतीक मानले जात असे. कैरोमधील इजिप्शियन म्युझियममधील माहितीनुसार, राजाने चालायला सुरुवात केल्यावर त्याचे पाय थेट या शत्रूंवर पडावेत, अशा पद्धतीने ही रचना केली होती. हे राजाच्या सामर्थ्याचे आणि तो शत्रूंना सतत आपल्या पायाखाली तुडवत असल्याचे प्रतीक होते. जेव्हा तुतानखामेनची ‌‘ममी‌’ सापडली, तेव्हा त्याच्या पायात शुद्ध सोन्याच्या चपला आणि बोटांवर सोन्याची आवरणे होती.

मात्र, थडग्यात सापडलेल्या या इतर लाकडी चपला राजाने त्याच्या हयातीत कधी वापरल्या होत्या की, त्या केवळ त्याच्या मृत्यूनंतरच्या प्रवासासाठी खास बनवण्यात आल्या होत्या, हे रहस्य आजही कायम आहे. हे थडगे प्राचीन काळात लुटले गेले होते आणि अनेक वस्तूंची हलवाहलव झाली होती, त्यामुळे या चपला नेमक्या कोणत्या कोपऱ्यात होत्या याचा निश्चित पुरावा मिळत नाही, तरीही त्या आजही इजिप्तच्या वैभवाची साक्ष देत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news