‘या’ हॉटेलमध्ये सर्व काही आहे सोन्याचे!

हनोई :

जगभरात अनेक अनोखी हॉटेल पाहायला मिळतात. कुठे बर्फापासून बनवलेले हॉटेल असते तर कुठे पर्वतकड्यावर लटकणारे. बर्फाच्या हॉटेलमध्ये 'सब कुछ' बर्फाचे असते, हे स्विडन किंवा कॅनडातील अशा हॉटेलवरून दिसून येते. मात्र, एखाद्या हॉटेलमध्ये सर्व काही सोन्याचे आहे असे पाहायला मिळाले तर? असे हॉटेल व्हिएतनाममध्ये आहे. या हॉटेलमध्ये दरवाजे, भिंतींपासून ते बाथटबपर्यंत सर्व काही अस्सल सोन्याने मढवलेले आहे!

व्हिएतनामची राजधानी हनोईमध्ये हे सोन्याचे हॉटेल आहे. गेल्यावर्षीच सुरू झालेल्या या हॉटेलमध्ये खिडक्या, टेबल, नळ, वॉशबेसिन, ताटे-वाट्यांपासून वॉशरूमपर्यंत सर्वत्र सोन्याची झळाळी दिसते. अगदी आरसेही सोन्याच्या फ—ेममध्येच पाहायला मिळतात. या हॉटेलचे नाव आहे 'डोल्से हनोई गोल्डन लेक'. तब्बल 25 मजल्यांचे हे पंचतारांकित हॉटेल असून त्यामध्ये 400 खोल्या आहेत. तेथील बाहेरच्या भिंतीवरच सुमारे 54 हजार चौरस फूट जागेत गोल्ड प्लेटेड टाईल्स लावलेल्या आहेत. हॉटेलमधील अनेक वस्तू सोन्याने अशा मढवलेल्या आहेत. बाथरूममधील शॉवरपासून ते बेडरूममधील फर्निचरपर्यंत सर्व काही सोन्याने मढवलेले आहे. याठिकाणी राहणार्‍या ग्राहकांना आपण जणू काही सोन्याच्या महालातच राहत आहोत असे वाटण्यासारखे हे ठिकाण आहे. अर्थातच तिथे राहायचे म्हणजे खिसाही तितकाच रिकामा करण्याची तयारी हवी!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news