Ancient Hunter Toolkit | तीस हजार वर्षांपूर्वीच्या शिकार्‍याचे ’व्यक्तिगत टूलकिट’

thirty thousand years old hunter personal toolkit
Ancient Hunter Toolkit | तीस हजार वर्षांपूर्वीच्या शिकार्‍याचे ’व्यक्तिगत टूलकिट’Pudhari File Photo
Published on
Updated on

लंडन : चेक रिपब्लिकमध्ये सुमारे 30,000 वर्षांपूर्वीच्या एका शिकारी-संग्राहकाचे ‘व्यक्तिगत टूलकिट’ असावे असे दगडी साहित्य आढळून आले आहे. संशोधकांना 2021 मध्ये मिलोव्हाईस खत या पुराणाश्मयुगीन स्थळाच्या उत्खननादरम्यान कलाकृतींचा हा अविश्वसनीय समूह सापडला.

या ‘किट’मध्ये एकत्र जमा झालेले 29 दगडांचे पाते आणि लहान पाते आढळले आहेत. ‘जर्नल ऑफ पॅलेओलिथिक आर्कियॉलॉजी’मध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार, या वस्तूंच्या आढळण्याच्या स्वरूपावरून असे सूचित होते की, त्या ठेवल्या गेल्या तेव्हा त्या बांधलेल्या अवस्थेत होत्या, कदाचित त्या लवकर नष्ट होणार्‍या पदार्थापासून बनवलेल्या कंटेनरमध्ये किंवा आवरणात ठेवल्या गेल्या असाव्यात. संशोधकांनी सुचवले आहे की, हा दुर्मीळ संग्रह एका प्रागैतिहासिक व्यक्तीचा व्यक्तिगत सामानाचा संच असण्याची शक्यता आहे, ज्याचा वापर शिकारी मोहिमा किंवा स्थलांतराच्या प्रवासादरम्यान केला गेला असेल.

लिंग अज्ञात असलेल्या या व्यक्तीने हे सामान एका निवासी शिबिरात गमावले किंवा जाणूनबुजून टाकून दिले असावे, असे संशोधन पथकाचे म्हणणे आहे. हा शोध सुमारे 3.3 दशलक्ष वर्षांपूर्वी ते 10,000 वर्षांपूर्वीच्या पुराणाश्मयुगातील एका शिकारी-संग्राहकाच्या जीवनाची एक महत्त्वपूर्ण झलक देतो. चेक अकादमी ऑफ सायन्सेसच्या पुरातत्त्व संस्थेचे संशोधक आणि या अभ्यासाचे पहिले लेखक डोमिनिक चलाचुला यांनी सांगितले की, ‘पुराणाश्मयुगासाठी अतिशय दुर्मीळ’ असलेल्या एका व्यक्तीच्या आयुष्यातील एका घटनेवर या कलाकृती प्रकाश टाकतात. चलाचुला म्हणाले की, या शोधामुळे स्थलांतरादरम्यान किंवा शिकार करण्याच्या सहलींदरम्यान प्रागैतिहासिक लोकांच्या वर्तनावर प्रकाश पडू शकतो. कारण, अशा क्रियाकलापांचे लँडस्केपमध्ये फार कमी अवशेष मागे राहतात आणि त्यामुळे ते पुरातत्त्वशास्त्रज्ञांना जवळजवळ अद़ृश्य असतात. जिथे या वस्तू आढळल्या, ते मिलोव्हाईस खत हे ठिकाण उच्च पुराणाश्मयुगातील हजारो वर्षांच्या मानवी गतिविधीचा पुरावा दर्शवते.

संशोधकांच्या मते, या थरातील पुराव्यांवरून असे दिसून येते की, पुराणाश्मयुगीन मानवांनी या स्थळाचा वापर शिबिर करणे, अवजारे बनवणे आणि प्राण्यांचे मांस कापणे अशा विविध कामांसाठी केला असावा. चलाचुला म्हणाले की, जर हे प्रस्तावित शिकारीचे टूलकिट विखुरलेले अवस्थेत आढळले असते, तर ते मिलोव्हाईस खत स्थळावर सामान्यपणे आढळणार्‍या इतर टाकून दिलेल्या किंवा जीर्ण झालेल्या कलाकृतींपेक्षा वेगळे दिसले नसते. तो संदर्भ आहे, ज्यामुळे ते मनोरंजक ठरले आहे. अवजारांच्या आणि त्यांच्या झिजेच्या खुणांच्या विश्लेषणातून दिसून आले की, त्यांचा वापर विविध प्रकारे केला गेला होता. काही अवजारे प्रक्षेपक म्हणून वापरल्याचा तात्पुरता पुरावा दर्शवतात, तर इतरांचा वापर कापण्यासाठी, खरडण्यासाठी आणि छिद्र पाडण्यासाठी केला गेला असावा. या अभ्यासानुसार, या अवजारांचा वापर मांस प्रक्रिया, प्राण्यांची कातडी आणि लाकूड यांसारख्या कामांसाठी केला गेला असावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news