झोपेत बोलण्यामागे असतात ‘ही’ कारणे...

झोपेतही मेंदूचा काही भाग हा सतत काहीतरी क्रिया करत असतो
sleep talking reasons
लोक झोपेत बोलतात याची कारणे जाणून घेवू. Pudhari File Photo
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : मेंदू हा आपल्या शरीरातील सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. मेंदू आपल्या शरीराला कार्य करण्यास मदत करतो. उदाहरण संवाद साधणं, कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देणं तसेच उठण्या-बसण्यापर्यंतही सगळ्या गोष्टींसाठी मेंदू संकेत देतो की, आपण आता हे करायला हवं. कोणतीही क्रिया करताना अनेकदा आपण विचार करतो तर अनेकदा काही गोष्टी पुढच्या सेकंदाला घडतात तर हे कशामुळे तर हे मेंदू जे आपल्याला संकेत देतात त्यावरून होतं. आता तुम्ही झोपेत असतानाच बघा, आपण झोपलेलो असतो तेव्हा आपला मेंदूही झोपतो असं अनेकांना वाटतं. मात्र, हे सत्य नाही. मेंदूचा काही भाग हा सतत काहीतरी क्रिया करत असतो. रात्री आपल्याला अनेकदा स्वप्नं पडतात. काही लोक डोळे उघडे ठेवून झोपतात, काही लोक झोपेत बोलतात आणि काही लोक तर चक्क झोपेत प्रश्नांची उत्तरे देतात. आता हे नक्की कशामुळे होत असेल, हे आज आपण जाणून घेऊया...

2017 च्या एका अभ्यासात असं दिसून आलं आहे की, 66 टक्के लोक हे झोपेत बोलतात आणि लहान मुलांमध्ये ही टक्केवारी 50 टक्के आहे. लहान मुलांमध्ये ही समस्या खूप सामान्य आहे. तुम्हाला असलेला हा त्रास आधी तुमच्या घरच्यांनाच समजून येतो. उदाहरणार्थ, झोपेत हसणं, तोंडातल्या तोंडात पुटपुटणं, ओरडणं, झोपेत लोकांची अभिव्यक्ती बदलणे ही झोपेत बोलण्याची लक्षणं आहेत. यात सामान्य दोन शब्द वापरले जातात ते म्हणजे ‘हो’ किंवा ‘नाही’. झोपेत बोलणं हे अतिविचार, ताणतणाव किंवा आणखी काही मानसिक त्रासामुळे होऊ शकतं. हे धोकादायकसुद्धा असू शकतं. कारण अनेक लोक झोपेत तुमच्या शेजारच्या व्यक्तीला लाथ मारणे, ठोसा मारणे किंवा काहीही करू शकतात. किती तरी लोक झोपेत चालूही लागतात. झोपेत बोलण्याच्या सवयीमुळे किती तरी लोकांना लाज वाटू लागते. कारण चुकून कधी कोणत्या व्यक्तीबद्दल वाईट बोलले आणि त्या व्यक्तीनं ऐकलं तर ते किती लाजिरवाणं होईल, असं त्यांना सतत वाटत असतं. हा त्रास अनुवांशिकसुद्धा असू शकतो. झोपेत बोलण्याची ही घटना मानसिक आजाराशी संबंध असल्याचे अनेक लोक म्हणतात. पण ते तसं नाही.

sleep talking reasons
Calcium : कॅल्शियम कमी असण्याची ‘ही’ असतात लक्षणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news