Swallowed thermometer medical case | वीस वर्षांपूर्वी गिळलेले थर्मामीटर काढले बाहेर

Swallowed thermometer medical case |
Swallowed thermometer medical case | वीस वर्षांपूर्वी गिळलेले थर्मामीटर काढले बाहेर
Published on
Updated on

बीजिंग : लहानपणी चुकून गिळलेली एखादी वस्तू 20 वर्षांनंतर अचानक तुमच्या समोर आली तर? चीनमधील एका व्यक्तीसोबत असाच काहीसा प्रकार घडला असून, या घटनेने वैद्यकीय विश्वाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. पोटदुखीच्या तक्रारीमुळे रुग्णालयात पोहोचलेल्या 32 वर्षीय ‘वांग’ नावाच्या व्यक्तीच्या पोटात डॉक्टरांना अशी गोष्ट आढळली, ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. त्याने वीस वर्षांपूर्वी गिळलेले थर्मामीटर आता डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून बाहेर काढले आहे.

चीनच्या झेजियांग प्रांतातील वेनझोऊ शहरात राहणार्‍या वांग यांनी वयाच्या 12 व्या वर्षी भीतीपोटी आपल्या पालकांपासून एक गुपित लपवून ठेवले होते. ते गुपित तब्बल 20 वर्षांनंतर जीवघेणा धोका बनून समोर आले. वांग यांना गेल्या काही काळापासून पोटात तीव— वेदना होत होत्या. जेव्हा वेदना असहनीय झाल्या, तेव्हा त्यांनी वेनझोऊ मेडिकल युनिव्हर्सिटीच्या रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांनी जेव्हा वांग यांच्या पोटाचे स्कॅन केले, तेव्हा त्यांना लहान आतड्याच्या जवळ एक लांब आणि पातळ वस्तू दिसली. डॉक्टरांना तत्काळ संशय आला की, हे थर्मामीटर आहे.

थर्मामीटरचे टोक आतड्याच्या भिंतीला स्पर्श करत असल्याने अंतर्गत रक्तस्राव किंवा आतडे फाटण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता. डॉक्टरांनी विचारपूस केल्यानंतर वांग यांना 20 वर्षांपूर्वीची घटना आठवली. वांग यांनी सांगितले की, ‘जेव्हा मी 12 वर्षांचा होतो, तेव्हा चुकून माझ्याकडून थर्मामीटर गिळले गेले होते. त्यावेळी माझे आई-वडील कामात व्यस्त असायचे आणि मी ही गोष्ट सांगायला खूप घाबरलो होतो.’ त्या काळात कोणतीही वेदना किंवा त्रास न झाल्यामुळे ते ही गोष्ट पूर्णपणे विसरून गेले होते.

आपल्या शरीरात आपण ‘मौत का पारा’ (पारा) घेऊन फिरत आहोत, याची त्यांना पुसटशी कल्पनाही नव्हती. थर्मामीटर ज्या ठिकाणी अडकले होते, तिथून ते बाहेर काढणे डॉक्टरांसाठी मोठे आव्हान होते; कारण ते पित्तनलिकेच्या अत्यंत जवळ होते. एंडोस्कोपी केंद्रातील तज्ज्ञांनी कमालीची खबरदारी घेत अवघ्या 20 मिनिटांत ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. बाहेर काढल्यानंतर असे दिसले की, थर्मामीटर सुरक्षित होते; मात्र त्यावरील आकडे पुसले गेले होते. जर हे थर्मामीटर आत फुटले असते, तर त्यातील पार्‍यामुळे वांग यांचा मृत्यू ओढवला असता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news