

कैरो : इजिप्तच्या प्राचीन संस्कृती आणि इतिहासातील एक अमूल्य ठेवा असलेले सुमारे तीन हजार वर्षे जुने सोन्याचे ब्रेसलेट कैरो येथील इजिप्शियन म्युझियममधून चोरीला गेल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हे ब्रेसलेट तिसर्या मध्यवर्ती काळातील राजा फॅरो अमेनेमोपयाचे होते. एका म्युझियम कर्मचार्याने हे ब्रेसलेट चोरून ते केवळ 4,000 (सुमारे 3,30,000 रुपये) पेक्षा कमी किमतीत विकले. विशेष म्हणजे, खरेदीदाराने ते लगेच वितळवून त्याचे सोन्यात रूपांतर केले आहे.
या सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला संग्रहालयातील कर्मचार्यांना हे ब्रेसलेट एका गायब झाल्याचे आढळले. अधिकार्यांनी तपास सुरू केला आणि पोलिसांनी चार संशयितांना अटक केली. तपासामध्ये असे आढळले की, म्युझियममधील एका कर्मचार्याने हे ब्रेसलेट चोरले. त्याने ते एका सराफाला विकले, त्याने ते वितळवून टाकले. सोन्याच्या दागिन्यांच्या तस्करीत अशा धातूच्या दुर्मीळ कलाकृतींना वितळवून टाकणे सामान्य आहे. यामुळे मूळ कलाकृतीचा शोध घेणे अत्यंत कठीण होते. इजिप्तमध्ये ऐतिहासिक वस्तूंची चोरी करणे आणि त्यांची तस्करी करणे हा एक गंभीर गुन्हा मानला जातो. यासाठी जन्मठेपेची शिक्षा आणि 1 लाख डॉलर्सपर्यंत (सुमारे 83 लाख रुपये) दंड ठोठावला जाऊ शकतो.