Unique Circular Temple | चौसष्ट योगिनींचे अनोखे गोलाकार मंदिर

गावातील डाळ-रोटी परदेशी पर्यटकांमध्येही लोकप्रिय
Unique Circular Temple |
Unique Circular Temple | चौसष्ट योगिनींचे अनोखे गोलाकार मंदिर
Published on
Updated on

मोरेना : मध्य प्रदेशात अशी अनेक गावे आहेत, ज्यांची ओळख केवळ देशातच नव्हे तर परदेशातही निर्माण झाली आहे. यातीलच एक प्रसिद्ध गाव मोरेना जिल्ह्यात आहे, जिथे विदेशी पर्यटक केवळ ऐतिहासिक वारसा पाहण्यासाठी येत नाहीत, तर येथील अस्सल देशी आदरातिथ्य, मातीचा सुगंध आणि पारंपरिक डाळ-रोटीची चव चाखण्यासाठी खास येतात. या गावाची खासियत अशी आहे की, इथे आलेला कोणताही पर्यटक डाळ-रोटी खाल्ल्याशिवाय परत जात नाही. हेच आदरातिथ्य आज या ग्रामस्थांच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन बनले आहे.

या प्रसिद्ध गावाचे नाव ‘मितवली’ असे आहे. या गावातील एका उंच टेकडीवर ‘चौसष्ट योगिनी मंदिर’ वसलेले आहे. असे मानले जाते की, भारताच्या जुन्या संसद भवनाची रचना याच मंदिराच्या धर्तीवर करण्यात आली होती. हे मंदिर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गोल रचनेसाठी आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी जगभरात ओळखले जाते. या मंदिराची निर्मिती १०५५ ते १०७५ इसवी दरम्यान कच्छपघात राजा देवपाल यांनी केली होती असे मानले जाते. सुरुवातीला या मंदिराची निर्मिती केवळ ज्योतिष आणि गणिताचे शिक्षण देण्यासाठी करण्यात आली होती. परंतु, नंतरच्या काळात हे स्थान धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे प्रमुख केंद्र बनले. १९५१ मध्ये या मंदिराला राष्ट्रीय प्राचीन आणि ऐतिहासिक स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.

काही ऐतिहासिक उल्लेखांनुसार त्रिपुरीच्या कलचुरी घराण्याचे राजा युवराज दुसरे यांनी हे मंदिर बांधल्याचाही उल्लेख आढळतो. हिंदू धर्मात 'चौसष्ट योगिनी' हा देवीच्या ६४ शक्तींचा समूह मानला जातो. यामुळे या मंदिराला विशेष धार्मिक महत्त्व आहे. पूर्वीच्या काळात येथे तांत्रिक विधी आणि साधना केल्या जात असत. त्यामुळे या मंदिराला 'तांत्रिकांची युनिव्हर्सिटी' म्हणूनही ओळखले जात असे. देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांच्या राहण्यासाठी पर्यटन विभागातर्फे गावात पाच 'होम-स्टे' तयार करण्यात आले आहेत. हे होम-स्टे पूर्णपणे अस्सल देशी आणि ग्रामीण शैलीत सजवण्यात आले आहेत. येथे राहून पर्यटक स्थानिक खाद्यपदार्थांचा आणि गावातील शांत वातावरणाचा आनंद घेतात. यामुळे गावकऱ्यांनाही चांगला रोजगार मिळाला आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना खास बाजरीच्या पिठाचे टिक्कड (गावरान भाकरी) आणि गरमागरम डाळ प्रेमाने वाढली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news