The Meeting on the Turret Stairs mystery | 19 व्या शतकातील ‘द मिटिंग ऑन द टर्रेट स्टेअर्स’ मागील रहस्य

The Meeting on the Turret Stairs mystery |
The Meeting on the Turret Stairs mystery | 19 व्या शतकातील ‘द मिटिंग ऑन द टर्रेट स्टेअर्स’ मागील रहस्य
Published on
Updated on

डब्लिन; वृत्तसंस्था : 19 व्या शतकातील एक चित्र आज पुन्हा एकदा जगभर चर्चेत आले आहे. सोशल मीडियावर विशेषतः टिकटॉकवर व्हायरल झाल्यानंतर ‘द मिटिंग ऑन द टर्रेट स्टेअर्स’ या चित्राकडे पुन्हा एकदा कलारसिकांचे लक्ष वेधले गेले आहे. प्रेम, वेदना आणि विरह यांचा अद्भुत संगम असलेले हे चित्र अनेकांना ‘आयुष्य बदलून टाकणारा क्षण’ वाटत आहे.

हे चित्र आज नॅशनल म्यझियम ऑफ आर्यलंड येथे ठेवले आहे. विशेष बाब म्हणजे हे चित्र आठवड्यात फक्त दोन तासांसाठीच सार्वजनिक दर्शनासाठी ठेवले जाते, त्यामुळे ते पाहण्यासाठी लांबच लांब रांगा लागतात.

मध्ययुगीन प्रेमकथेतून जन्मलेले चित्र

हे चित्र 1864 साली आयरिश चित्रकार फे्रडरिक विल्यम बर्टन यांनी रंगवले. ‘हेलेलिल अँड हिल्डब्रँड’ या नावानेही ओळखले जाणारे हे जलरंग चित्र मध्ययुगीन डॅनिश लोकगीतावर आधारित आहे. त्या लोकगीतातील कथा अशी आहे की, राजकुमारी हेल्लेलिल आणि तिचा अंगरक्षक हिल्डेब्रँड यांच्यात प्रेम जडते. मात्र, राजकुमारीच्या कठोर वडिलांना हे नाते मान्य नसते. चित्रात या दोघांची शेवटची भेट दाखवली आहे. राजकुमार हिल्डेब्रँडला मृत्यूला सामोरे जावे लागणार आहे आणि त्याआधी तो आपल्या प्रेयसीला शेवटचा निरोप देण्यासाठी भेटतो. त्या क्षणातील वेदना, प्रेम आणि असहायता कलाकाराने अत्यंत प्रभावीपणे रंगवली आहे.

या चित्रात लाल आणि निळ्या रंगांचे ठळक स्ट्रोक वापरून कलाकाराने तीव्र भावनिक वातावरण तयार केले आहे. दोघांच्या चेहर्‍यावरील भाव पाहूनच प्रेक्षकांना त्यांच्या मनातील वेदना जाणवते. प्रसिद्ध कादंबरीकार जॉर्ज इलिऑट यांनी या चित्राबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, ‘हे चित्र सहजपणे साधारण किंवा अश्लील वाटू शकले असते; पण कलाकाराने त्याला अत्यंत सुसंस्कृत भावनांच्या उंचीवर नेले आहे.’

फक्त दोन तास का पाहता येते?

हे चित्र जलरंगात तयार केलेले असल्यामुळे प्रकाशामुळे त्याचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे त्याचे जतन करण्यासाठी ते कायमस्वरूपी प्रदर्शित केले जात नाही. आठवड्यातील फक्त दोन तासांसाठी ते लोकांसाठी खुले केले जाते. आज सोशल मीडियामुळे या चित्राची लोकप्रियता पुन्हा वाढली आहे. प्रेमाच्या अंतिम आणि वेदनादायी क्षणाचे इतके प्रभावी चित्रण असल्यामुळे ‘द मिटिंग ऑन द टर्रेट स्टेअर्स’ हे चित्र आजही प्रेक्षकांच्या मनाला खोलवर स्पर्श करते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news