जगातील सर्वात महाग टॉयलेट पेपर

जगातील सर्वात महाग टॉयलेट पेपर
Toilet paper
जगातील सर्वात महाग टॉयलेट पेपर pudhari photo

सडनी ः सोन्यासारख्या राजधातूचा वापर हल्ली कशासाठी करतील हे काही सांगता येत नाही. चप्पलापासून ते चक्क कमोडपर्यंत सोन्याचा वापर करण्यात आलेला आहे. आता कमोडच जर सोन्याचे बनवले जात असेल, तर ओघानेच टॉयलेट पेपरही सोन्याचा असू शकतो.

ऑस्ट्रेलियातील एक कंपनी ‘टॉयलेट पेपर मॅन’ने असा सोन्याचा टॉयलेट पेपर बनवलाही आहे. 22 कॅरेट सोन्यापासून बनवलेला हा पेपर अर्थातच जगातील सर्वात महागडा टॉयलेट पेपर ठरला आहे.

कंपनीने त्यांच्या वेबसाईटवर याबाबतची माहिती दिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, त्यांनी बनवलेला सोन्याच्या टॉयलेट पेपरची रिळ आता विकली गेली असून, नवी रिळ स्टॉकमध्ये उपलब्ध नाही! कंपनीने या टॉयलेट पेपरची किंमत 10 कोटी, 75 लाख, 45 हजार, 750 रुपये इतकी ठेवली होती. तसेच यासोबत एक शॅम्पेन बाटली मोफत दिली होती. कंपनीने सोन्यापासून बनवलेला हा टॉयलेट पेपर चकाकणारा तर आहेच; पण मुलायमही आहे.

एका रिपोर्टनुसार, हा पेपर तयार करणार्‍या कंपनीला असा टॉयलेट पेपर बनवण्याची कल्पना दुबईतील व एका हॉटेलमधील सोन्याच्या कमोडमुळेच सुचली होती. जर टॉयलेट सीट सोन्याची आहे, तर मग टॉयलेट पेपरही सोन्याचा का बनवू नये? असा विचार कंपनीवाल्यांनी केला होता. त्यानुसार त्यांनी सोन्याच्या टॉयलेट पेपरची ही रिल बनवली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news