

नवी दिल्ली : डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यासारखे आजार झाल्यावर आपल्याला डासांच्या उत्पत्तीबाबत कुतुहल निर्माण होते. डासांचा जीवनकाळ अतिशय मर्यादित असतो, हे आपल्यातील अनेकांना माहीत नसेल. नर डासाचे आयुष्य हे केवळ 10 दिवसांचे तर मादी डासाचे आयुष्य 40 ते 50 दिवसांचे असते. यातील आणखी आश्चर्याची बाब म्हणजे मादी आपल्या संपूर्ण आयुष्यात केवळ एकदाच शारीरिक संबंध ठेवते. या एकावेळी झालेल्या संबंधातून ही मादी डास जवळपास 200 ते 500 अंडी घालते. ही अंडी मादी डासाने माणसाच्या प्यायलेल्या रक्तातून पोसली जातात.
डासांच्या उत्पत्तीची ही संख्या कमी कशी होईल याबाबत संशोधन अनेक वर्षांपासून संशोधक करीत आहेत. मात्र, त्यांना अद्याप यश आलेले नाही. मादी डासाच्या पंखांच्या आवाजावरुन नर डास त्यांना ओळखतो. मादी डास मिनिटाला 250 ते 500 वेळा आपल्या पंखांची फडफड करतात. मादी एकदाच शारीरिक संबंध ठेवत असली तरीही नर डास एकाहून जास्त वेळा संबंध ठेऊ शकतो. एकदा मादीशी शारीरिक संबंध आले की त्यानंतर नर केवळ तीन ते पाच दिवस जगतो. डासांच्या संबंधांचा कालावधी केवळ 15 सेकंदांचा असतो. यातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे डास संबंध ठेवताना जमिनीवरच असतील असे नाही, तर ते हवेतही शारीरिक संबंध ठेऊ शकतात. नर डासातून मादीमध्ये येणार्या घटकांमध्ये विविध आजाराला कारणीभूत ठरणारेही काही घटक असतात. त्यामुळे शारीरिक संबंधांनंतर मादी डास चावल्यास व्यक्तीला डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया यासारखे आजार होतात. विशेष म्हणजे एका डासातून 200 ते 500 च्या दरम्यान अंड्यांची उत्पत्ती होत असल्याने एकावेळी अनेक डास विशिष्ट भागात तयार होतात. त्यामुळे डासांचा फैलाव वेगाने होताना दिसतो. अनेकदा विविध उपाययोजना करूनही ही संख्या आटोक्यात येणे अवघड होऊन बसते.