माऊंट एव्हरेस्टची उंची वाढतच आहे...

गेल्या 89 हजार वर्षांमध्ये माऊंट एव्हरेस्ट 15 ते 50 मीटरने उंच वाढला
Mount Everest Height
माऊंट एव्हरेस्टची उंची वाढतच आहे...John Harper
Published on
Updated on

काठमांडू : जगातील सर्वात उंच पर्वतशिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टची उंची अजूनही वाढतच आहे. माऊंट एव्हरेस्ट सर करणं प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं. हजारो गिर्यारोहक एव्हरेस्टवर चढाई करण्याचा प्रयत्न करतात. नेपाळचे स्थानिक लोक एव्हरेस्टला सागरमाथा म्हणजेच ‘स्वर्गाचं शिखर’ म्हणतात. तर तिबेटमध्ये माऊंट एव्हरेस्टला ‘चोमोलुंग्मा’ म्हणजेच ‘पर्वतांची राणी’ म्हटलं जातं. असा हा माऊंट एव्हरेस्ट दरवर्षी उंचीने वाढत चालले आहे. गेल्या 89 हजार वर्षांमध्ये माऊंट एव्हरेस्ट 15 ते 50 मीटरने उंच वाढला आहे आणि दरवर्षी माऊंट एव्हरेस्टची उंची वाढतच जात आहे. ‘नेचर जिओसायन्स’ने हा अहवाल प्रकाशित केला आहे. हिमालयातून वाहणार्‍या आणि सुमारे 89 हजार वर्षांपूर्वी विलीन झालेल्या दोन प्राचीन नद्यांमुळे एव्हरेस्टची उंची वाढत असल्याचा दावा केला जात आहे.

माउंट एव्हरेस्टची उंची पुन्हा मोजणार; भूकंपामुळे उंची घटली?

2020 मध्ये माऊंट एव्हरेस्टची उंची 8,848.86 मीटर मोजण्यात आली. चीन आणि नेपाळने मिळून संयुक्तपणे ही घोषणा केली होती. माऊंट एव्हरेस्ट 50 ते 60 दशलक्ष वर्षे जुना आहे. दर शतकाला एव्हरेस्टची उंची सुमारे अर्धा मीटर वाढतेय. 2015 मधल्या भीषण भूकंपाचा एव्हरेस्टच्या उंचीवर परिणाम झाला असण्याची शक्यता काही भूशास्त्रज्ञांनी व्यक्त केली होती. यापूर्वी चीनने 1975मध्ये पहिल्यांदा आणि त्यानंतर 2005मध्ये माऊंट एव्हरेस्टची उंची मोजली होती. मात्र आता माऊंट एव्हरेस्टची उंची पुन्हा वाढली असण्याची शक्यता आहे. एकीकडे हिमनद्या वितळताना दिसतात, तर दुसरीकडे माऊंट एव्हरेस्टची उंची वाढताना दिसतेय; मात्र सतत वितळणार्‍या हिमनद्यांमुळे भारतीय नद्यांना जलसंकटाचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती संशोधकांनी वर्तवली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news