अंबानी कुटुंबाकडे देशातील पहिले खासगी ‘बोईंग 737 मॅक्स9’ जेट

विमानाची किंमत जाणून व्हाल थक्क!
Mukes Ambani's Boeing 737 Max 9
मुकेश अंबानी यांनी घेतलेले ‘बोईंग 737 मॅक्स9’ जेटPudhari Photo
Published on
Updated on

मुंबई ः मुकेश अंबानी व त्यांच्या कुटुंबीयांच्या श्रीमंतीची चर्चा देश-विदेशात होत असते. अलीकडेच त्यांचा धाकटा मुलगा अनंत व राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा आणि लालबागच्या राजाला अर्पण केलेला वीस कोटींचा मुकूटही चर्चेत होता. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी अंबानी कुटुंब केवळ त्यांच्या आलिशान कार कलेक्शनसाठी नाही, तर अनेक खासगी जेटही आहेत. मुकेश अंबानींनी अलीकडेच भारतातील पहिले बोईंग बीबीजे 737 मॅक्स 9 खासगी जेट खरेदी केले, जे कधीही न पाहिलेले आहे. अल्ट्रा लाँग रेंज बिझनेस जेट बोइंग 737 मॅक्स 9 ची किंमत सुमारे एक हजार कोटी रुपये असून कोणत्याही भारतीय व्यावसायिकाने खरेदी केलेले आतापर्यंतचे हे सर्वात महागडे खासगी विमान आहे.

Mukes Ambani's Boeing 737 Max 9
Ambani Wedding : आज अंबानी यांच्या घरी नेत्रदीपक विवाह सोहळा

मुकेश अंबानींनी या खासगी जेटमध्ये मोठे फेरबदल केले आणि नुकतेच आपल्या कलेक्शनमध्ये जोडले. 13 एप्रिल 2023 पासून या जेटमध्येसुधारणा आणि चाचणी उड्डाणांची प्रक्रिया सुरू झाली होती ज्यामध्ये सहा चाचणी उड्डाणे करण्यात आली. या जेटमध्ये दोन शक्तिशाली इंजिन बसवण्यात असून ते बोईंगच्या रेंटन उत्पादन प्रकल्पात तयार केले जाते. या प्रायव्हेट जेटच्या केबिनवर अंबानी कुटुंबाने शेकडो कोटी रुपये खर्च केले असून गरजेनुसार जेट तयार करण्यात आले आहे आणि दिसायला अतिशय सुंदर आहे. बोईंग बीबीजे 737 मॅक्स 9 ची केबिन आधीच अतिशय सुंदर आणि एखाद्या राजवाड्यासारखी आहे. बोईंग बीबीजे 737 8 च्या तुलनेत नवीन मॅक्स 9 मध्ये एक मोठी आणि प्रशस्त केबिन असून या विमानाचा चडछ क्रमांक 8401 आहे जो खासगी जेट एकावेळी सुमारे 11,770 किमी अंतरापर्यंत उड्डाण करू शकते. तसेच या जेटच्या केबिनमध्ये अशी सर्व आरामदायी वैशिष्ट्ये आहेत ज्यांची अपेक्षाही केली जाऊ शकत नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news