Terabyte data: स्वयंपाकघरातील काचेत आता साठवता येणार टेराबाईटस्‌‍ डेटा

मायक्रोसॉफ्टचा दहा हजार वर्षे टिकणाऱ्या ‌‘ग्लास स्टोरेज‌’चा यशस्वी प्रयोग
Terabyte data
Terabyte data: स्वयंपाकघरातील काचेत आता साठवता येणार टेराबाईटस्‌‍ डेटाPudhari
Published on
Updated on

वॉशिंग्टन : तुमच्या स्वयंपाकघरातील काचेची भांडी किंवा ओव्हनचे दरवाजे ज्या काचेपासून बनलेले असतात, त्याच काचेमध्ये आता हजारो चित्रपट आणि अफाट डेटा सुरक्षितपणे साठवता येणे शक्य होणार आहे. मायक्रोसॉफ्टने त्यांच्या ‌‘प्रोजेक्ट सिलिका‌’अंतर्गत डेटा साठवण्याच्या तंत्रज्ञानात मोठी प्रगती केली असून, या काचेवरील माहिती तब्बल 10,000 वर्षांपर्यंत सुरक्षित राहू शकते, असा दावा संशोधकांनी केला आहे.

या संशोधनाचे तपशील बुधवारी (दि. 18) ‌‘नेचर‌’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. 2019 पासून सुरू असलेल्या या प्रकल्पात आतापर्यंत केवळ ‌‘प्युअर फ्युज्ड सिलिका‌’ या महागड्या काचेचा वापर केला जात असे. मात्र, ताज्या संशोधनात वैज्ञानिकांनी ‌‘बोरोसिलिकेट ग्लास‌’ वापरून डेटा साठवण्यात यश मिळवले आहे. ही काच सामान्यतः कडक आणि उष्णतारोधक असते, जिचा वापर घरातील स्वयंपाकाच्या भांड्यांसाठी केला जातो. मायक्रोसॉफ्टचे रिसर्च मॅनेजर रिचर्ड ब्लॅक यांनी सांगितले की, ‌‘या शोधामुळे या तंत्रज्ञानाच्या व्यापारीकरणातील मोठा अडथळा दूर झाला आहे.

आता कमी खर्चात आणि सहज उपलब्ध होणाऱ्या माध्यमातून डेटा साठवणे शक्य होईल. ‌‘संशोधकांनी 2 बाय 120 मिलीमीटर आकाराच्या काचेच्या तुकड्यावर 4.8 टेराबाईटस्‌‍ डेटा साठवून दाखवला. हे प्रमाण साधारणपणे 200 हाय-डेफिनिशन (4 घ) चित्रपटांच्या बरोबरीचे आहे. काचेवर डेटा लिहिण्याचा वेग 3.13 चइ प्रति सेकंद इतका आहे. जरी हा वेग सध्याच्या हार्ड ड्राईव्ह (160 चइ/ी) किंवा डडऊ (7,000 चइ/ी) पेक्षा कमी असला, तरी त्याचे आयुष्य अधिक आहे. जिथे सामान्य हार्ड ड्राईव्ह 5 ते 10 वर्षे टिकतात, तिथे ही काच 10,000 वर्षे डेटा जतन करू शकते. हे तंत्रज्ञान दैनंदिन वापरासाठी (उदा. लॅपटॉप किंवा फोन) नसून प्रामुख्याने ‌‘आर्काइव्हल‌’ म्हणजेच दीर्घकाळ माहिती जतन करण्यासाठी वापरले जाईल.

भविष्यात मानवी संस्कृतीचा इतिहास, संगीत आणि महत्त्वाचा डेटा पिढ्यान्‌‍पिढ्या सुरक्षित ठेवण्यासाठी हे एक उत्तम माध्यम ठरणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून नॉर्वेमधील ‌‘ग्लोबल म्युझिक वॉल्ट‌’मध्ये महत्त्वाचे संगीत जतन करण्याची योजना मायक्रोसॉफ्टने आधीच आखली आहे. डेटा साठवण्याच्या क्षेत्रात केवळ काचच नाही, तर ‌‘डीएनए स्टोरेज‌’वरही संशोधन सुरू आहे, ज्यामध्ये केवळ अर्धा मैल लांबीच्या डीएनए धाग्यात 360ढइ डेटा साठवण्याची क्षमता असल्याचा दावा दुसऱ्या एका संशोधनात करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news