टॅटूप्रेमींना लिम्फोमाचा धोका 81 टक्के अधिक

टॅटूच्या शाईमुळे लिम्फोमाचा धोका वाढतो 81 टक्क्यांनी
Tattoos can increase risk of lymphoma
टॅटूमुळे लिम्फोमाचा धोका वाढतोPudhari File Photo
Published on
Updated on

लंडनः सध्या फॅशन फ्रिक लोकांना कपड्यांसोबतच काही वेगळी शैली अंगीकारणे आवडते. ज्यामध्ये तुम्हाला अनेक टॅटू प्रेमी सापडतील, ज्यांना त्यांच्या शरीरावर एकापेक्षा जास्त डिझाईन कोरणे आवडते. पण, अशा टॅटूप्रेमींनी थोडे सावध राहणे आवश्यक आहे. कारण, ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. यासंदर्भात नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, टॅटू काढणार्‍या लोकांमध्ये रक्ताचा कर्करोग असलेल्या लिम्फोमाचा धोका 81 टक्क्यांपर्यंत जास्त असतो.

टॅटू बनवल्याने वाढतो ब्लड कॅन्सरचा धोका

स्वीडनमध्ये याबाबत टॅटूवर केलेल्या संशोधनात असे समोर आले आहे की, टॅटू बनवल्याने ब्लड कॅन्सरचा धोका वाढतो. यासंदर्भात संशोधकाने स्वीडिश नॅशनल कॅन्सर रजिस्टरचा 10 वर्षे म्हणजेच 2007 ते 2017 या कालावधीत 20 ते 60 वर्षे वयोगटातील लोकांचा सखोल अभ्यास केला होता, ज्यामध्ये शाई वापरल्याचे आढळून आले. टॅटूसाठी त्यात आढळणारे रसायन लिम्फोमाचा धोका वाढवते. सध्यातरी याबाबत कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही.

टॅटूच्या शाईमध्ये आढळतात कर्करोग निर्माण करणारे पदार्थ

संशोधनात असे आढळून आले आहे की, टॅटूच्या शाईमध्ये अनेकदा कर्करोग निर्माण करणारे पदार्थ असतात. सर्वप्रथम टॅटू बनवण्याच्या प्रक्रियेत सुगंधी अमाइन, पॉलिसायक्लिक फ्रॅग्रन्स हायड्रोकार्बन्स आणि धातू वापरल्या जातात. त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती प्रभावित होते. असे म्हटले जाते की, टॅटू शाई इंजेक्शनद्वारे डिझाईन तयार करते, ज्यामुळे आपल्या लिम्फ नोड्समध्ये रंगद्रव्ये जमा झाल्यामुळे आपल्या आरोग्यास कर्करोगाचा धोका असतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news