नवी दिल्ली : आपल्याकडे अनेकांच्या घरी सकाळी न्याहारीसाठी कांदापोहे केले जात असतात. वजन कमी करण्यासाठी न्याहारी म्हणजेच ब्रेकफास्ट करणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही योग्य न्याहारी खाल्ली, तर त्यामुळे शरीरात संपूर्ण दिवस ऊर्जा तर राहतेच; पण वजन कमी होण्यासही मदत होते. काही लोक वजन कमी करण्यासाठी सकाळचा नाश्ता टाळतात, परंतु यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते. वजन कमी करण्यासाठी पोहे हा एक आरोग्यदायी पर्याय आहे, असे आहारतज्ज्ञ सांगतात.
पोह्यांचा नाश्तामुळे 5 किलो वजन कमी करू शकता
आहारतज्ज्ञांच्या मते, नाश्ता केल्याने तुम्ही सुमारे 5 किलो वजन कमी करू शकता. पोह्यांमध्ये लोह, फॉस्फरस, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि कार्ब्स मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामध्ये अतिशय कमी कॅलरीज असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. पोह्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते. पोहे खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते आणि भूक लागत नाही. त्यामुळे वजन घटवण्यास सहाय्य होते. पोहे पचायला सोपे आहेत. ज्यांची पचनशक्ती कमकुवत आहे, त्यांनी त्यांच्या आहारात पोह्यांचा समावेश करावा. हे आवश्यक नाही की तुम्ही पोहे फक्त नाश्त्यातच खाऊ शकता. रात्रीच्या जेवणात किंवा संध्याकाळच्या नाश्त्यातही खाऊ शकता. अर्थात, पोहे कमी तेलात करणे गरजेचे ठरते.