Black hole collision | दोन महाकाय कृष्णविवरांची 100 वर्षांत होणार महाटक्कर!

Black hole collision |
Black hole collision | दोन महाकाय कृष्णविवरांची 100 वर्षांत होणार महाटक्कर!
Published on
Updated on

वॉशिंग्टन : अंतराळ विज्ञानाच्या जगात एक अत्यंत दुर्मीळ आणि थरारक घटना समोर आली आहे. खगोलशास्त्रज्ञांनी प्रकाशाचा वर्षाव करणार्‍या दोन महाकाय कृष्णविवरांच्या जोडीचा शोध लावला आहे. ही दोन्ही कृष्णविवरे एकमेकांभोवती वेगाने फिरत असून, येत्या 100 वर्षांच्या आत त्यांची एकमेकांशी भीषण टक्कर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दशकांपासून रेडिओ टेलिस्कोपच्या साहाय्याने केलेल्या निरीक्षणांनंतर, शास्त्रज्ञांनी ‘मार्केरियन 501’ नावाच्या एका तेजस्वी वस्तूचा अभ्यास केला. सुरुवातीला याला ‘ब्लेझर’ मानले जात होते. ब्लेझर म्हणजे एखाद्या आकाशगंगेचे अत्यंत तेजस्वी केंद्र, जे साधारणपणे एका कृष्णविवरामुळे उजळलेले असते. ही आकाशगंगा आपल्या सूर्यमालेपासून सुमारे 50 कोटी प्रकाशवर्षे दूर आहे. परंतु, ताज्या निरीक्षणातून या प्रकाशाच्या मागे लपलेला ऊर्जेचा एक छुपा प्रवाह (जेट) दिसून आला आहे.

यावरून शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला आहे की, तिथे एक नव्हे तर दोन कृष्णविवरे आहेत, जी विलीनीकरणाच्या उंबरठ्यावर आहेत. मॅक्स-प्लँक इन्स्टिट्यूट फॉर रेडिओ अ‍ॅस्ट्रोनॉमी येथील खगोलशास्त्रज्ञ आणि या अभ्यासाच्या सहलेखिका सिल्के बि—ट्झेन यांनी सांगितले की, ‘या टकरीनंतर शेवटी एकच विशाल कृष्णविवर शिल्लक राहील. हे दोन्ही कृष्णविवर ज्या प्रकारे एकमेकांभोवती ‘नृत्य’ करत आहेत, ते पाहणे खरोखरच कुतूहलजनक आहे.’ हे संशोधन 27 मार्च रोजी ‘मंथली नोटिसेस ऑफ द रॉयल अ‍ॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झाले आहे. संशोधनातील महत्त्वाचे टप्पे: दोन ऊर्जा प्रवाहांचा शोध: 10 रेडिओ टेलिस्कोपच्या ‘व्हेरी लाँग बेसलाईन अ‍ॅरे’ (VLBA) नेटवर्कमधील 83 हून अधिक डेटासेटचा अभ्यास करण्यात आला.

विशाल वस्तुमान: यातील प्रत्येक कृष्णविवराचे वजन सूर्याच्या वस्तुमानापेक्षा 10 कोटी ते 1 अब्ज पट जास्त असल्याचा अंदाज आहे. विचित्र दिशा: सामान्यतः ब्लेझरमध्ये एकच ऊर्जा प्रवाह असतो, पण येथे एक दुसरा प्रवाह घड्याळाच्या उलट दिशेने फिरताना आढळला, ज्याने शास्त्रज्ञांना चकित केले. खगोलशास्त्रज्ञांच्या मते, ही टक्कर अंतराळातील भौतिकशास्त्राचे नियम समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल. जरी ही घटना 100 वर्षांनंतर घडणार असली, तरी त्याचे परिणाम आणि त्यातून निर्माण होणार्‍या लहरींचा अभ्यास आतापासूनच सुरू झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news