Super El Nino: ‘सुपर‌’ एल निनोमुळे यंदा तापमानाचे सर्व विक्रम मोडीत?

जगभरातील हवामान शास्त्रज्ञांनी यंदाच्या उन्हाळ्यात ‌‘एल निनो‌’ सक्रिय होण्याचा इशारा दिला असून, यामुळे जागतिक तापमानात अभूतपूर्व वाढ होऊन उष्णतेचे नवे विक्रम प्रस्थापित होऊ शकतात
Super El Nino
Super El Nino: ‘सुपर‌’ एल निनोमुळे यंदा तापमानाचे सर्व विक्रम मोडीत?Pudhari
Published on
Updated on

वॉशिंग्टन : जगभरातील हवामान शास्त्रज्ञांनी यंदाच्या उन्हाळ्यात ‌‘एल निनो‌’ सक्रिय होण्याचा इशारा दिला असून, यामुळे जागतिक तापमानात अभूतपूर्व वाढ होऊन उष्णतेचे नवे विक्रम प्रस्थापित होऊ शकतात. अमेरिकेच्या ‌‘नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन‌’ (छजअअ) ने दिलेल्या माहितीनुसार, जून ते ऑगस्ट दरम्यान एल निनो येण्याची शक्यता 62 टक्के इतकी आहे.

‌‘एल निनो‌’ ही प्रशांत महासागरातील वातावरणीय आणि समुद्राच्या पाण्याच्या तापमानात होणाऱ्या बदलांची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. यामध्ये समुद्राच्या पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढते. सध्या प्रशांत महासागरात ‌‘ला निना‌’ म्हणजेच थंड पाण्याचा टप्पा सुरू आहे, जो येत्या काही आठवड्यांत संपण्याची शक्यता आहे. जेव्हा समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा किमान 0.5 अंश सेल्सिअसने वाढते, तेव्हा एल निनोची स्थिती निर्माण होते. ‌‘ॲक्युवेदर‌’ या हवामान संस्थेच्या अहवालानुसार, हा एल निनो अत्यंत तीव होऊन त्याचे रूपांतर ‌‘सुपर एल निनो‌’मध्ये होऊ शकते.

जेव्हा समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा 2 अंश सेल्सिअसने वाढते, तेव्हा त्याला ‌‘सुपर एल निनो‌’ म्हटले जाते. नोव्हेंबर अखेरपर्यंत अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता 15 टक्के वर्तवण्यात आली आहे. एल निनोमुळे पृथ्वीचे तापमान वाढून भीषण उष्णतेच्या लाटा येऊ शकतात. अमेरिकेच्या उत्तरेकडील भागात कोरडे आणि उष्ण हवामान राहील, तर दक्षिण भागात पूर येण्याचा धोका वाढेल. एल निनोमुळे पॅसिफिक महासागरात चक्रीवादळांचा जोर वाढतो, तर अटलांटिक महासागरातील चक्रीवादळांचे प्रमाण कमी होते. येत्या शरद ऋतूपासून हिवाळ्यापर्यंत एल निनोची तीवता मध्यम ते तीव राहण्याची शक्यता आहे, मात्र त्याच्या नेमक्या तीवतेबद्दल अद्याप अनिश्चितता आहे, असे हवामान तज्ज्ञ पॉल पेस्टलोक यांनी सांगितले.

सामान्यतः एल निनो आणि ला निना हे चक्र दर दोन ते सात वर्षांनी येते. प्रत्येक टप्पा साधारण 9 ते 12 महिने टिकतो. परंतु यावेळी एल निनोची संभाव्य तीवता पाहता जगभरातील देशांना हवामान बदलांच्या मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news