

वॉशिंग्टन : आठ दिवसांच्या मोहिमेसाठी बुच विल्मोर यांच्यासह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स अद्याप तिथेच आहेत. त्या तिथे ‘अडकून पडल्या’ वगैरे म्हटले जात असले तरी तसे अर्थातच नाही, याचे कारण म्हणजे हे दोन्ही अंतराळवीर यापूर्वीही दीर्घकाळ अंतराळ स्थानकावर राहिलेले आहेत. आमच्याकडे इथे करण्यासारखे भरपूर काम आहे, असे नुकतेच सुनीता यांनी म्हटले होते. त्यांनी आतापर्यंतच्या कारकिर्दीत सातवेळा स्थानकाबाहेर पडून स्पेसवॉकही केले होते. आता त्यांनी गुरुवारी संध्याकाळी भारतीय वेळेनुसार 6.30 वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर स्पेसवॉक केला. यावेळी त्यांचे स्पेस पार्टनर निक हेगही त्यांच्यासोबत होते.
नासाने त्यांच्या स्पेसवॉकचे लाईव्ह फुटेज शेअर केले आहे. या स्पेसवॉकचा उद्देश न्यूट्रॉन स्टार इंटिरियर कंपोझिशन एक्सप्लोरर एक्स-रे टेलिस्कोपची दुरुस्ती करणे आहे. ‘यूएस स्पेसवॉक-91’ असे या मोहिमेचे नाव आहे. सुनीता विल्यम्स यांच्या कारकिर्दीतील हे 8 वे स्पेसवॉक आणि हेग यांचे चौथे स्पेसवॉक आहे. हा स्पेसवॉक सुमारे साडेसहा तास चालला. या स्पेसवॉकदरम्यान सुनीता आणि त्यांचे सहकारी निक हेग यांनी आयएसएसच्या बाहेरील भागाच्या दुरुस्तीचे काम केले. यामध्ये स्टेशनच्या नेव्हिगेशन उपकरणांची दुरुस्ती करणे, एनआयसीईआर एक्स-रे टेलिस्कोपची दुरुस्ती करणे आहे. ‘यूएस स्पेसवॉक-91’ असे या मोहिमेचे नाव आहे. सुनीता विल्यम्स यांच्या कारकिर्दीतील हे 8 वे स्पेसवॉक आणि हेग यांचे चौथे स्पेसवॉक आहे. हा स्पेसवॉक सुमारे साडेसहा तास चालला. या स्पेसवॉकदरम्यान सुनीता आणि त्यांचे सहकारी निक हेग यांनी आयएसएसच्या बाहेरील भागाच्या दुरुस्तीचे काम केले. यामध्ये स्टेशनच्या नेव्हिगेशन उपकरणांची दुरुस्ती करणे, क्ष-किरण दुर्बिणीवरील प्रकाश फिल्टर पॅच करणे आणि आंतरराष्ट्रीय डॉकिंग अडॅप्टरवर बसवलेले परावर्तक उपकरण बदलणे समाविष्ट आहे. सुनीता विल्यम्स यांनी 12 वर्षांनंतर हा स्पेसवॉक केला. ‘नासा’ने माहिती दिली होती की, सुनीता आणि बुच विल्मोर यांना फेब—ुवारी 2025 मध्ये एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सच्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टद्वारे परत आणले जाईल; मात्र आता त्यांच्या पुनरागमनासाठी आणखी वेळ लागू शकतो. नासाने गेल्या महिन्यात सांगितले होते की, त्यांना मार्च 2025 अखेरची वाट पाहावी लागेल. ही तारीख एप्रिलच्या सुरुवातीपर्यंत वाढू शकते.