अंतर्मुख स्वभावाचे यशस्वी लोक

Successful people with introverted nature
अंतर्मुख स्वभावाचे यशस्वी लोकPudhari File Photo
Published on
Updated on

कठोपनिषदात म्हटले आहे की परमात्म्याने आपली इंद्रिये बहिर्मुख करून त्यांना हिंसित केले आहे. त्यामुळे लोक बाह्यविषयांकडेच पाहतात, स्वतःच्या अंतरंगाकडे त्यांचे लक्ष नसते. मात्र जगाच्या पाठीवर काही लोक अंतर्मुख स्वभावाचेही असतात. इतरांच्या नजरेत हे लोक

स्वतःच्याच कोषात असल्यासारखे दिसत असले तरी त्यांचे मन विश्वाकार झालेले असू शकते! अशा अनेक अंतर्मुख स्वभावाच्या लोकांनी जग अक्षरशः जिंकलेले आहे. अशाच काही लोकांची ही माहिती...

अब्राहम लिंकन : अमेरिकेचे दिवंगत राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा जन्म

12 फेब्रुवारी 1809 मध्य केंटकी येथील एका लॉग केबिनमध्ये झाला. त्यांनी स्वयं-शिक्षणाचा सराव केला आणि एक वकील, राजकीय नेते, इलिनॉय राज्यातील काँग्रेस सदस्य व नंतर अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष बनले. आपल्या कारकिर्दीत अनेक सुधारणा घडवून आणणारे लिंकन मुळात एक अंतर्मुख व्यक्ती होते.

अल्बर्ट आईन्स्टाईन

14 मार्च 1879 रोजी जन्मलेले महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन हे एक अंतर्मुख व्यक्ती होते. त्यांचे एक प्रसिद्ध वक्तव्य आहे. त्यामध्ये ते म्हणतात, शांत जीवनातील एकसंधता आणि एकटेपणा सर्जनशील मनाला उत्तेजित करतो, जगाला सापेक्षतावादाचा सिद्धांत देणारा हा शास्त्रज्ञ आपल्या असामान्य बुद्धिमत्तेसाठी ओळखला जातो.

एलेनॉर रुझवेल्ट

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांच्या पत्नी आणि दीर्घकाळ अमेरिकेच्या ‘फर्स्ट लेडी’ असलेल्या अ‍ॅना एलेनॉर रुझवेल्ट यांची ओळख एक अमेरिकन राजकीय व्यक्ती, मुत्सद्दी आणि सामाजिक कार्यकर्ती अशीही आहे. आई-वडील आणि भावंडांच्या अकाली निधनानंतर त्यांना बराच त्रास सहन करावा लागला होता. मात्र आपल्या अंतर्मुख स्वभावाने सर्व अडचणींवर मात करून त्यांनी मानवाधिकार कार्यकर्ती म्हणून तसेच संयुक्त राष्ट्रसंघातही प्रभावी काम केले.

बिल गेटस्

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक व अनेक वर्षे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले बिल गेटस् यांचा जन्म 28 ऑक्टोबर 1955 मध्ये झाला. एक परोपकारी व्यक्ती म्हणूनही जगभर त्यांची ओळख आहे. 1987 पासून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांचा समावेश होतो. 140 अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेले गेटस् हे लहान वयापासूनच एक अंतर्मुख स्वभावाचे व्यक्ती म्हणून ओळखले जातात.

मार्क झुकेरबर्ग

‘फेसबुक’चे संस्थापक मार्क झुकेरबर्ग सध्याच्या काळातील जगातील एक अग्रगण्य उद्योजक आहेत. ‘टाईम’ मासिकाने 2008, 2011, 2016 आणि 2019 मध्ये जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून त्यांच्या नावाची नोंद घेतली होती. 2010 मध्ये त्यांना ‘टाईम’ मासिकाने ‘पर्सन ऑफ द इअर’ म्हणूनही निवडले होते. एक यशस्वी आयटी तज्ज्ञ व उद्योजक असलेले झुकेरबर्ग लहान वयापासूनच अंतर्मुख व्यक्ती आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news