Chewing gum explosion incident | च्युईंग गमच्या स्फोटामुळे विद्यार्थ्याचा झाला होता दुर्दैवी अंत

Chewing gum explosion incident |
Chewing gum explosion incident | च्युईंग गमच्या स्फोटामुळे विद्यार्थ्याचा झाला होता दुर्दैवी अंत
Published on
Updated on

मॉस्को : रसायनशास्त्राचा अभ्यास करणार्‍या एका विद्यार्थ्याचा मृत्यू जगातील सर्वात विचित्र आणि भयानक अपघातांपैकी एक मानला जातो. 25 वर्षीय विद्यार्थी व्लादिमीर लिखोनोस याचा मृत्यू त्याच्या तोंडात असलेल्या च्युईंग गमचा अचानक स्फोट झाल्यामुळे झाला. ही घटना इतकी भीषण होती की, या स्फोटात त्याच्या चेहर्‍याचा खालचा भाग आणि जबडा पूर्णपणे छिन्नविछिन्न झाला. व्लादिमीर हा स्फोटक रसायनांवर काम करत होता. प्रयोगादरम्यान झालेल्या एका लहानशा चुकीने या भीषण अपघाताला जन्म दिला. व्लादिमीरला एक विचित्र सवय होती; च्युईंग गमची चव वाढवण्यासाठी तो वारंवार ते सायट्रिक अ‍ॅसिडमध्ये (लिंबामध्ये आढळणारे आंबट द्रव्य) बुडवून खात असे. ही त्याच्या दैनंदिन सवयीचा भाग बनली होती.

2009 मधील त्या दुर्दैवी सकाळी, व्लादिमीरने नेहमीप्रमाणे आपले च्युईंग गम एका डब्यातील पावडरीमध्ये बुडवले. मात्र, घाईगडबडीत किंवा अनावधानाने त्याने ते सायट्रिक अ‍ॅसिडऐवजी तिथेच ठेवलेल्या एका अत्यंत घातक स्फोटक पावडरीमध्ये बुडवले. ही छोटीशी चूक त्याच्या जीवावर बेतली. अहवालानुसार, जसे व्लादिमीरने ते च्युईंग गम पुन्हा तोंडात ठेवले, तसे त्यातील स्फोटक द्रव्य सक्रिय झाले आणि क्षणार्धात मोठा धमाका झाला.

हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, त्याच्या चेहर्‍याचा खालचा भाग पूर्णपणे निकामी झाला. तपास करणार्‍या पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले की, त्याच्या टेबलावर सुमारे 100 ग्रॅम संशयास्पद स्फोटक पावडर सापडली. विशेष म्हणजे, ही पावडर दिसायला हुबेहूब सायट्रिक अ‍ॅसिडसारखीच होती, ज्यामुळे ही मोठी चूक घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात काम करताना थोडासा निष्काळजीपणा किती महाग पडू शकतो, याचे हे एक हृदयद्रावक उदाहरण ठरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news