Timmy Humpback Whale | भरकटलेल्या देवमाशाभोवती षड्‌यंत्र

Timmy Humpback Whale |
Timmy Humpback Whale | भरकटलेल्या देवमाशाभोवती षड्‌यंत्र
Published on: 
Updated on: 

बर्लिन : जर्मनीच्या बाल्टिक समुद्रकिनाऱ्यावर पोएल बेटाजवळ भरकटलेला १२ मीटर लांबीचा हंपबॅक देवमासा (नाव - टिमी) संपूर्ण देशात राजकीय वादळ, षड्‌यंत्र सिद्धांत आणि प्राणीप्रेमींच्या भावनांचा केंद्रबिंदू ठरला. मार्च महिन्यात किनाऱ्यावर अडकलेल्या या देवमाशाला वाचवण्यावरून शास्त्रज्ञ, राजकारणी आणि सोशल मीडियावरील जमाव आमनेसामने आले.

बाल्टिक समुद्रातील पाणी उथळ आणि कमी खारट असल्याने देवमाशाच्या त्वचेवर गंभीर संसर्ग झाला होता. तो आजारी असल्याने कोणतीही बचाव मोहीम त्याच्या जीवावर बेतू शकते, असा इशारा सागरी शास्त्रज्ञांनी दिला होता. मात्र, सोशल मीडियावर याचे रूपांतर राजकीय रोषात झाले. स्थानिक अग्निशमन प्रमुख बोडो कोपनिक देवमाशावर समुद्राचे पाणी फवारत असताना, ते अ‍ॅसिड टाकत असल्याच्या आणि देवमाशाचा सांगाडा विकून युक्रेनला निधी दिला जाणार असल्याच्या अफवा पसरल्या.

अखेर, पर्यावरणमंत्री टिल बॅकहाऊस यांनी दोन कोट्यधीशांच्या आर्थिक मदतीने सुरू असलेल्या खासगी बचाव मोहिमेला परवानगी दिली. या देवमाशाला एका बार्जमध्ये घालून उत्तर समुद्राकडे नेण्यात आले आणि २ मे रोजी समुद्रात सोडण्यात आले. मात्र, अवघ्या काही दिवसांतच टिमीचा मृत्यू होऊन तिचा मृतदेह डेन्मार्कच्या किनाऱ्यावर आढळला. या मोहिमेवर तब्बल २० लाख युरो खर्च होऊनही अपयश आल्याने आता कायदेशीर वाद आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.